Our contact numbers are currently down. Please reach us at travel@veenaworld.com or 8879973807 or 9152004513. We apologize for the inconvenience

IndiaIndia
WorldWorld
Foreign Nationals/NRIs travelling to

India+91 915 200 4511

World+91 887 997 2221

Business hours

10am - 6pm

व्हेन इन रोम

19 mins. read

Published in the Sunday Sakal on 23 June, 2024

दीड महिना लेखनातून सुट्टी घेतली. समर व्हेकेशन. ह्यावेळी आम्हाला मात्र कुठेही जायला परवानगी नसते कारण जे पर्यटक वीणा वर्ल्ड सोबत पर्यटनाला जातात त्यांची सर्व काळजी आमचे टूर मॅनेजर्स आणि त्यांच्या सपोर्टला असणारी ऑफिस टीम घेत असते. सर्वांच्या मॉरल सपोर्टसाठी आम्ही ठिय्या मारून असतो इथे. आता पुन्हा आपल्याशी हा सुसंवाद सुरू करीत आहोत.

गेल्या वर्षीच्या आगस्टमध्ये तब्बल अठरा दिवस ग्रीसमध्ये फिरलो. आमचे ग्रीक असोसिएट निकोलस आणि निकोलेता सोबतीला होते त्यामुळे प्रत्येक शहर पिंजून काढलं ग्रीसमधलं. तसा वेळ कमीच पडला म्हणायचा, तरी सांतोरिनी आणि मिकोनोस आधी पाहिलेलं असल्यामुळे ती दोन्ही ठिकाणं ह्यावेळी आम्ही गाळली होती. `हा देश एवढा सुंदर का आहे?’ हा एकच प्रश्‍न आम्हाला पडायचा, एवढं सगळं सौफ्लदर्य अगदी ठासून भरलंय या देशात. माणसंही मस्त. भरपूर काम करतात आणि तेवढाच आयुष्याचा आनंदही उपभोगतात. आमचं आणि आमच्या असोसिएटचं मिशन आहे जास्तीत जास्त भारतीयांना ग्रीस दाखवायचं आणि म्हणूनच आम्ही सहा दिवस, आठ दिवस, दहा दिवस आणि ऑल ऑफ ग्रीसची चक्क पंधरा दिवसांची टूर असं आमच्या पर्यटकांच्या आवडीत सवडीत बसेल आणि बजेटमध्ये असेल अशा तऱ्हेने ग्रीसच्या टूसची आखणी केली आहे. टर्की सोबत ग्रीस किंवा इजिप्त टर्कीसोबत ग्रीस ह्या कॉम्बिनेशन टूर्स आहेतच. असो, ग्रीसचं प्रमोशन हा आजच्या लेखाचा विषय नाही. `मिटेअोरा‘ हे ग्रीसमधलं ठिकाण काहीही करून आम्हाला बघायचंच होतं आणि कोणत्यातरी एका आयटिनरीमध्ये त्याचा समावेश करायचा होता. मजल दरमजल करीत आम्ही पोहोचलो कालाबाका गावात आणि तिथून ाइव्ह करून किंवा ेकिंग करीत आम्हाला अजस्त्र पहाडांवरच्या मिटिअोराच्या त्या जगप्रसिद्ध मोनॅस्ीज्‌‍ना भेट द्यायची होती. आम्ही पायथ्याशी गेलो आणि आम्हाला कळलं की इथे लेडिजना जीन्स शॉर्टस्‌‍ मिनीस्कर्ट घालून जायला बंदी आहे. जीन्स असेल तर त्यावर लुंगीसारखं काहीतरी पायघोळ बांधायचं. आता आली का पंचाइत. म्हणजे एवढा द्राविडी प्राणायाम करून आता मॉनेस्ी न बघताच जायचं? पण तेवढ्यात ट्यूब पेटली, अ आपल्या बॅगा आपल्या सोबतच आहेत की. स्कार्फ किंवा स्टोलची लुंगी बनवता येईल जीन्सच्या वर. माझ्या स्कार्फने वेळ निभावून नेली आणि आम्ही उंचावरच्या डोफ्लगरावरून आणखी तीनशे पायऱ्या चढून वर गेलो. `स्वर्ग पाहिला म्या डोळा’ अगदी असा अनुभव आला. कालाबाकामध्ये फक्त ह्या एकाच ठिकाणी हे अजस्त्र पहाड कसे काय उत्पन्न झाले असतील हा प्रश्‍न पडल्याशिवाय रहात नाही. एवढ्या उंचावर शेकडो वर्षांपूर्वी ह्या अप्रतिम मोनॅस्ीज्‌‍ कशा बांधल्या असतील. आत्ताच्या काळातही हे कठीण जाईल बनवायला. मिटेअोरा हा एक अनोखा चमत्कार आहे आणि माझ्या प्रवासातलं इन्स्पिशन.

जगात कुठेही गेलं तरी रूढी परंपरांमधलं साम्य आपल्याला जाणवतं. मग त्या त्या ठिकाणी आपल्याला त्यांच्या पद्धतीनुसार वागावं लागतं. थिरूअनंतपुरमच्या पद्मनाभस्वामी मंदिराची आठवण झाली. पुरुषांनी लुंगी, धोती किंवा मुंडू म्हणतात ते वस्त्र धारण करायचं, वर शर्ट कुर्ता काही नाही आणि महिलांनी साडी किंवा स्कर्ट ब्लाऊज. पर्यटकांना घेऊन आम्ही जगात अनेक रीलिजियस ठिकाणी जातो तेव्हा मग ते मंदीर असो वा चर्च, कथिल, बॅसिलिका, मस्जिद, सिनॅगॉग... कधी अमृतसरच्या गोल्डन टेम्पलसारखं डोक्यावर स्कार्फ गुंडाळावा लागतो तर कधी ग्रीसमधल्या मिटेअोरा सारखं पायघोळ वस्त्र. पण एक मात्र आहे की कोणत्याही धर्माच्या पवित्र स्थानी जाताना गुडघे आणि खांदे उघडे नकोत. शॉर्टस्‌‍, मिनी स्कर्टस्‌‍, स्लिव्हलेस्‌‍ टॉप्स ह्या गोष्टींना बऱ्याच ठिकाणी बंदी आहे. थोडक्यात पवित्र स्थळी वा तीर्थक्षेत्री जाताना योग्य साजेसे कपडे घालावे. मिटेअोरानंतर एक मोठा स्कार्फ मी पर्समध्ये ठेवायला सुरुवात केली. आमचं फिरणं म्हणजे बऱ्याचदा शोधकार्यच असतं. कुठे काय एखादा स्पॉट चांगला मिळून जाईल सांगता येत नाही. बहुतेक धार्मिक स्थळं सुद्धा अशा काही मस्त ठिकाणी, उंच पहाडांवर असतात की देवदर्शन स्थलदर्शन बनून जातं. तुम्हीसुद्धा जेव्हा तुमच्या पर्यटनात एखाद्या अशा धार्मिक ठिकाणी जाता तेव्हा ह्या गोष्टी लक्षात ठेवून तसे कपडे त्या दिवसासाठी किंवा त्या वेळेसाठी सोबत ठेवणं आवश्‍यक आहे. बी प्रीपेअर्ड.

फक्त धार्मिक स्थळीच असं कपड्यांचं बंधन असतं असं नाही तर जगात अनेक ठिकाणी असे निर्बंध आहेत आणि त्यानुसार आपल्याला वागावं लागतं. तुम्हाला आश्‍चर्य वाटेल पण मालदिव्हमध्ये स्विमिंग कॉश्‍चुमला बऱ्यापैकी बंदी आहे. मालदिव्हला जाऊन त्या निळ्या समुद्रात पोहणं हा एकमेव कार्यक्रम असतो. आता तिथे स्विमवेअर घालायचा नाही तर मग नेमकं करायचं काय? तर त्याचं असं आहे की मालदिव्हच्या प्रायव्हेट हॉटेल प्रॉपर्टीमध्ये तुम्ही जे हवं ते करू शकता पण पब्लिक बीचेस्‌‍वर स्त्रीयांना ते अलाऊड नाही कारण हा पूर्ण मुस्लिम देश आहे. क्रोएशियामधलं व्हार आयलंड फेमस आहे ते जगातले सूपर रिच लोक इथे रहातात म्हणून. आता क्रोएशियाच्या ह्या व्हार आयलंड वरच्या नीळ्या समुद्रात पोहणं हा जरी मुख्य कार्यक्रम असला तरी पब्लिक प्लेसेस मध्ये खाणं आणि पिणं ह्याला बंदी आहे. तसंच स्विमसूटमध्ये फिरायलाही बंदी आहे. असं कुणी सापडलंच तर सातशे ते हजार युरोचा दंड आहे. तुम्हाला आठवत असेल 2010 मध्ये फ्रान्समध्ये बुरख्यावर बंदी आणली. फ्रान्समध्ये हिजाब निकाब अबाया बुर्खाखाली चेहरा झाकायला बंदी आहे. अनेक मुस्लिम देश आता पर्यटनाभिमुख झाले आहेत. सौदी अबिया हे एक चांगलं उदाहरण. पुर्वी आम्ही सौदी अबियाच्या टूरचा विचारही केला नसता कारण महिलांना कम्पलसरी बुरखा घालवा लागायचा. आता त्यांनी आपला देश जगभरच्या पर्यटकांसाठी खुला केला आणि महिला पर्यटकांसाठी ही बुरख्याची सक्ती काढून टाकली. हुश्‍यsss हे झाल्या झाल्या आम्ही लागलीच सौदी अबीयाची टूर जाहीर केली. अर्थात तिथे एक मज्जाव अजून आहे तो म्हणजे मुलांनी मुलींचे कपडे घालायचे नाहीत वा मुलीसारखं वागायचं नाही. इटलीमधल्या चिंक्वीतेला फ्लिपफ्लॉप वा हाय हिल्सचे सॅन्डल्स घालायची बंदी आहे कारण काय तर तिथे बरीच पुरातन गावं असल्यामुळे रस्त्यांना भेगा गेल्यायत, जमीन वर खाली झालीय त्यामुळे ॲक्सिडट्ंस होतात. ग्रीसमध्ये तर अनेक वर्ल्ड हेरिटेज साइट्सवर हाय हिल्सना बंदी केलीय त्या ठिकाणांची जपणूक करण्यासाठी. हाय हिल्समुळे जमिन फाटते किंवा तिथल्या पुरातन टाइल्स खराब होतात. युगांडा सुदान स्वाझिलँडसारख्या देशात मुलींना गुडघे आणि शोल्डर्स झाकणाच कपडे घालण्याचा नियम आहे. त्याउलट मायामी, हवाई, कबीयन आयलंड, जर्मनीत अनेक ठिकाणी एकदम फ्री वातावरण आहे, तुम्ही बिनधास्त काहीही घालू शकता अगदी बिकिनी सुद्धा. ब्राझिलमध्ये तर कार्निव्हल टाईमला एकदम हटके म्हणजे समोरच्याला प्रोवोक करणा, चमचम करणा शायनी कपडे घालण्याची पद्धत आहे. लंडनच्या हॅरड्स सारख्या अनेक हाय-एन्ड शॉपिंग मॉलमध्ये क्लासी कपडे घालून जायचा अलिखित नियम आहे. आपणही मग त्या त्या ठिकाणी त्यांच्या पद्धतींप्रमाणे आपला पोषाख करण्याचा प्रयत्न करतो. नॉर्थ कोरीयाची तर गोष्टच वेगळी. आपल्या सारखे टूरिस्ट तर तिथे जातच नाहीत पण तिथल्या देशवासियांना मनाप्रमाणे कोणतेही कपडे घालण्याची मुभा नाही. वेस्टर्न कपडे तर नाहीच नाही. एवढंच कशाला, त्यांनी फक्त ॅडिशनल कपडेच घातले पाहिजेत आणि हेअरकटसुद्धा अमुक एका प्रकारचाच असला पाहिजे हा नियम आहे.

एका देशातून दुसऱ्या देशात जाताना आपल्याला आणखी एका गोष्टीचं भान ठेवावं लागतं ते म्हणजे नमस्कार किंवा ग्रिटिंग ची पद्धत. खूप वर्षांपूर्वी नव्याने जेव्हा आम्ही आमच्या इंग्लंड अमेरिकेच्या असोसिएट्सशी भेटायचो तेव्हा त्यांच्या `हग्ज आणि किसेस’ नी खूपच ऑकवर्ड वाटायचं. अजूनही तीस पस्तीस वर्षांनंतर माझा ऑकवर्डनेस कमी झालेला नाही. आजही पाहुण्यांच्या कोणत्या गालाला आपला कोणता गाल लावायचा ह्याबाबतीत माझा गोफ्लधळच उडतो. कोविडमध्ये बरं होतं संपूर्ण जगाने आपला नमस्कार थोड्याफार प्रमाणावर आपलासा केला होता. स्पर्श न करता समोरच्याचा मान सन्मान जपणारा आपल्या भारतीयांचा नमस्कार किंवा नमस्ते मला सर्वात चांगला ग्रिटिंग प्रकार वाटतो. तसाच नमस्कार म्हणजे `वाई’ थायलंडमध्ये आहे. हिंदूइझम आणि बुध्दिझमचा प्रभाव असावा, त्यात फक्त थाई लोक नमस्कार करताना थोडंसं झुकतात. जपानी तर फारच नम्रपणे ग्रिटिंग करतात. कधीकधी आपल्याला मजेशीर वाटतं, पण त्यांच्या वाकण्याच्या प्रकारात पण वैविध्य आहे किंवा वेगवेगळा अर्थ आहे. कंबर आणि पाठीचा कणा 150 मध्ये वाकून ग्रिटिंग करणं बहुतेकदा बिझनेस मिटिंग्जमध्ये होतं. 300 म्हणजे दु:खद घटनेसाठी केलेली भावनिक व्यक्तता. 450 वाकणं म्हणजे एखाद्याची क्षमा मागणं. फिलिपिन्स मध्ये जेष्ठ माणसांना ग्रीट करताना त्यांच्या हाताची मूठ आपल्या कपाळाला लावण्याची प्रथा आहे. नमस्ते, बाँजुर, अोला, नी हाव, चाँव, अस्सलाम आलेकूम, हाऊडी, कोनिचिवा, गुटन टाग, मरहाबा, शालोम अशा अनेक देशोदेशीच्या नमस्कारांने जगाचं वेलकम विविधरंगी झालं आहे. अनेक प्रकार असले तरी जगाचा विचार करता हँडशेक ची पद्धत सर्वात जास्त वापरली जाते. आज जगात 196 देश आहेत. प्रत्येक देशाचं वैशिष्ट्य वेगवेगळं आहे.

आपण ज्या देशात जातो त्या देशाबद्दल थोडीशी प्राथमिक माहिती आपल्याला असणं आवश्‍यक आहे. त्या देशाची भाषा, तिथल्या नमस्काराची पद्धत, `थँक्यू, सॉरी, एक्सक्यूज मी, हाऊ मच, वॉटर‘ साठीचे शब्द, त्या देशात काय करावं आणि काय करू नये ह्याची माहिती आपल्याकडे असली तर आपलं त्या देशातलं वास्तव्य सुखकर होतं.

सेंट ॲम्बरोझने सेंट अगस्टिनला चौथ्या शतकात सांगिलतच होतं नं, `व्हेन इन रोम डू ॲज्‌‍ द रोमन्स डू!’


अरेच्चा! हे मला माहितच नव्हतं...

Know the Unknown

इस्ट आफ्रिका खंडाच्या एका कोपऱ्यातला पण आपल्या वन्यजीवनामुळे सगळ्या जगाचे आकर्षण ठरलेला देश म्हणजे ‘केनिया’. आपल्या देशातील राजस्थान आणि उत्तर प्रदेश या दोन्ही राज्यांचा मिळून जितका आकार होतो, त्याच आकाराचा हा देश वर्षाला सुमारे दहा लाख पर्यटकांना आकर्षित करतो. केनियामधील वन्यजीवन हेच इथल्या पर्यटनाचा केंद्रबिंदू आहे. या देशात सुमारे 50 नॅशनल पार्क्स आहेत. या सगळ्या राष्ट्रीय उद्यानांमध्ये इथले वैविध्यपूर्ण वन्यजीवन अगदी मोठ्या संख्येनं सुखात नांदत आहे आणि म्हणूनच जगभरातील वन्यजीव प्रेमी-छायाचित्रकार हमखास केनियाला भेट देतातच. त्यातही ‘ग्रेट मायग्रेशन’ म्हणजे तर वन्यजीव प्रेमींसाठी पर्वणीच. हजारो वन्यजीवांच्या स्थलांतराचा नैसर्गिक चमत्कार पाहायला मिळतो तो केनियामधल्या ‘मसाइ मारा’ या नॅशनल पार्कमध्ये. हा नॅशनल पार्क केनियाला लागून असलेल्या टांझानिया देशातील सेरेनगेटी नॅशनल पार्कला जोडलेला आहे. सुमारे 1500 चौ.कि.मी. परिसरात पसरलेल्या मसाइ मारामध्ये आफ्रिकेतले बीग फाईव्ह म्हणजे हत्ती, सिंह, गेंडा, बिबट्या आणि केप बफेलो हे तर पाहायला मिळतातच पण त्याचबरोबर झेब्रा, जिराफ, गझेल्स म्हणजे हरणांचे प्रकार, पाणघोडा, माकडांचे प्रकार, विल्डरबीस्ट आणि शेकडो जातीचे पक्षीही पाहायला मिळतात. दरवर्षी जुलै ते ऑक्टोबर या काळात होणारे ग्रेट मायग्रेशन म्हणजे निसर्गाच्या नियमिततेचं अनोखं उदाहरण. सेरेनगेटी नॅशनल पार्कमधील गवत सुकल्यामुळे आणि पाणी आटल्यामुळे जुलैमध्ये तिथले लाखो प्राणी मसाइ माराकडे चालू लागतात. हा प्राण्यांचा ओघ अतिप्रचंड असतो. सुमारे साडे दहा लाख विल्डरबीस्ट, चार लाख झेब्रा, बारा हजार इलांड (हरणाचा प्रकार), तीन लाख गझेल्स इतक्या मोठ्या संख्येने प्राण्यांचा लोंढाच मसाइ मारामध्ये प्रवेश करतो. हा सगळा प्रवास जरी सपाट जमिनीवरचा असला तरी सेरेनगेटीमधून मसाइ मारा मध्ये येणाऱ्या या प्राण्यांचे स्वागत करायला जणू त्यांचा मृत्यू, शिकारी प्राण्यांच्या रुपाने उभाच असतो. जी मारा नदी त्यांना ओलांडावी लागते, त्यातील तीन एक हजार मगरी जशा भक्ष्य मिळवायला आतूर झालेल्या असतात तशाच प्रकारे जमिनीवर चित्ते, सिंह आणि बिबटेही आपली शिकार साधायला टपून बसलेले असतात. मात्र स्थलांतर करून येणाऱ्या प्राण्यांची संख्याच इतकी प्रचंड असते की या संकटांना न जुमानता त्यांचे कळप एका पाठोपाठ एक येत राहतात. केनियातील मसाइ मारामधील ग्रेट मायग्रेशन हा निसर्गातील एक अद्भुत घटनाक्रम आहे. त्यामुळे हे मायग्रेशन अनेक नैसर्गिक घटकांवर अवलंबून असते. सर्वसाधारणपणे जुलै महिन्यात टप्प्याटप्प्याने कळप स्थलांतराला सुरुवात करतात. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत ते मसाइ मारात स्थिरावलेले असतात. पुढे ऑक्टोबरमध्ये मसाइ मारामधले पाणी आणि गवत संपत आले की आलेले प्राणी परतीचे स्थलांतर सुरू करतात. नैसर्गिक प्रेरणा आणि घटकांमुळे होणारे ग्रेट मायग्रेशन पाहणे हा एक अत्यंत थरारक अनुभव असतो. चला ग्रेट मायग्रेशन बघायला.


वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल मिशन

Veena World Travel Mission

मीच माझी राणी!

मला स्वतःला वर्तमानात जगायला आवडतं. भविष्यात गुंतून न पडता आत्ताच्या क्षणाचा पुरेपुर आनंद घ्यायला मला आवडतो आणि म्हणूनच पर्यटन ही माझ्या हृदयाला सर्वात जवळ असलेली गोष्ट आहे. या गोष्टीचा मनापासून आनंद घेतानाच माझे वीणा वर्ल्डबरोबर सूर जुळले. गेली दहा वर्ष वीणा वर्ल्डच्या डोंबिवली कार्यालयातून माझ्या टूर्स बूक करते. आजपर्यंत मी 16 टूर्स केल्या आहेत आणि या जून महिन्यात 17 वी टूर करत आहे. मला वाटतं की प्रत्येक टूर, त्या टूरमध्ये तुम्ही भेट दिलेला प्रत्येक देश तुमच्या अनुभवाची कक्षा विस्तारत असतो. त्या त्या प्रदेशाचा इतिहास, भूगोल, संस्कृती, तिथल्या परंपरा, लोकजीवन याची माहिती आपल्याला पर्यटनामधून मिळते. त्यामुळे मी प्रत्येक सहलीकडे एक नवीन दालन उघडणारी सहल म्हणून बघते. मला माझ्या आगामी सहलीची ‘स्कँडिनेव्हिया विथ ईस्टर्न युरोप’ या सहलीची फार उत्कंठा लागली आहे. युरोपचा वेगळा चेहरा या सहलीत बघणार आहे आणि ते दर्शन घ्यायला मी आतुर आहे.

मी आजपर्यंत जगातले 35 देश बघितले आहेत. या सगळ्यात माझ्या कायम मनावर कोरली गेलेली जागा म्हणजे भारतातील अंदमान. या बेटावरचं निसर्गसौंदर्य खरोखरच थक्क करणारं आहे. इथला एलिफंट बीच तर मी कधीच विसरू शकत नाही. तिथलं नितळ, स्वच्छ पाणी मला आजही आठवतं. ही जागा माझ्यासाठी खास आहे, कारण इथेच मी पाण्यावर तरंगायला शिकले. मला वीणा वर्ल्डसोबत जायला आवडतं कारण त्यांची सेवा अतिशय प्रोफेशनल आहे. बुकींग ऑफिसपासून ते टूर मॅनेजर्सपर्यंत प्रत्येक बाबतीत एकदम तत्पर, आपुलकीची आणि विश्वासार्ह सेवा मला त्यांच्याकडून मिळते. बाहेरच्या देशात प्रवास करताना सुरक्षितता हा महत्वाचा पैलू असतो. ट्रान्सपोर्टपासून ते निवासव्यवस्थेपर्यंत प्रत्येक बाबतीत वीणा वर्ल्डकडून अतिशय सुविहित व्यवस्था केलेली असते. विशेषतः परदेश सहलींवरसुद्धा भारतीय भोजनाची व्यवस्था केली जाते. वीणा वर्ल्डच्या ‘वूमन्स स्पेशल’ सहलीवर मला आयुष्यातला सर्वात महत्वाचा मंत्र मिळाला आणि तो म्हणजे ‘मीच माझी राणी’. माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी हेच सूत्र अनुसरत आहे. आपण जेव्हा ग्रुप टूरवर जातो तेव्हा आपल्याला समविचारी लोक भेटतात व मित्रमंडळींचं वर्तुळ विस्तारतं.मला स्वतःला पर्यटन म्हणजे शरीराला आणि मनाला रिज्युवेनेट करण्याचा मार्ग वाटतो. पर्यटनामुळे आपल्याला भावनिक आणि आध्यात्मिक अंतर्दृष्टी मिळते. त्यामुळे मी पर्यटनासाठी कायम तयार असते.

ॲन नेपोलियन

कल्याण


काय बाई खाऊ कसं  गं खाऊ!

जगाच्या नकाशावर एखाद्या टिंबासारखा दिसणारा आणि बेटावर वसलेला देश म्हणजे सिंगापूर. हा चिमुकला देश जसा जगातला सेकंड हायेस्ट पॉप्युलेशन डेन्सिटीचा देश आहे तसाच हायेस्ट जिडीपी पर कॅपिटा असलेला देशही आहे. मानवनिर्मित आकर्षणांनी जगभरातल्या पर्यटकांना आकर्षित करून घेणाऱ्या सिंगापूरमधल्या खाद्यसंस्कृतीवर चायनाचा मोठा प्रभाव जाणवतो. पेरानाकन चायनिज लोकांनी त्यांचे पारंपरिक पदार्थ सिंगापूर, थायलंड, मलेशिया या देशात आणले. त्यातलाच एक म्हणजे ‘लक्सा’. नूडल्सपासून बनवला जाणारा हा तिखट पदार्थ सिंगापूरमध्ये विशेष लोकप्रिय आहे. लक्सा हे नाव चिनी भाषेच्या ‘मिन चायनिज’ या बोलीतून आलं आहे. स्पायसी म्हणजे तिखटला चायनिजमध्ये ‘ला‘ म्हणतात आणि ग्रेनी म्हणजे रवाळ अशा दोन शब्दांनी मिळून ‘लक्सा’ हे नाव बनले आहे. गमतीचा भाग म्हणजे संस्कृत मधील लक्ष लाखो या शब्दाचे लक्साशी असलेले साधर्म्य पाहता या पदार्थातील असंख्य नुडल्सवरून लक्ष हे नाव याला मिळाले असावे का? थिक राइस नूडल्स वापरून केलेला लक्सा सूपसारखा असतो. त्यात नारळाचे दूध असते, चवीला चिंच वापरतात. मासे किंवा कोलंबी मुख्यत्वे वापरतात, चिकन वापरूनही लक्सा करता येतो. लक्साचे वेगवेगळे प्रकार आहेत. काटोंग लक्सामध्ये नारळाच्या दुधाबरोबरच सुकवलेल्या कोलंबीचा चुराही वापरतात, ज्यामुळे लक्साला रवाळपणा येतो. सिगलाप लक्साला सजवण्यासाठी काकडी, मोड आलेली कडधान्ये, कांदा, व्हिएतनामीज कोथिंबीर वापरली जाते. तिखटपणासाठी जो चिली सम्बल वापरला जातो त्यामुळे लक्साची चव एकदम झणझणीत होते. शिवाय पारंपारिक चायनिजमध्ये वापरल्या जाणाऱ्या इतर मसाल्यांमुळे त्याला एक अनोखा स्वाद प्राप्त होतो. मग सिंगापूरच्या लक्साचा आस्वाद घ्यायचा असेल तर वीणा वर्ल्डच्या साउथ ईस्ट एशिया टूरमध्ये अवश्‍य सहभागी व्हो. देश-विदेशातील अशाच विविध खाद्यपरंपरा आणि ट्रॅव्हलचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा ‘ट्रॅव्हल एक्सप्लोअर सेलिब्रेट लाईफ’ हा पॉडकास्ट नक्की ऐका.


लक्झरी क्लोज टू होम!

वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌‍

हॉलिडेची खरी मजा कशात आहे? वेगवेगळी पर्यटन आकर्षणे पाहण्यात तर नक्कीच आहे, पण त्याला जर लक्झुरियस फॅसिलिटीज्‌‍ची जोड मिळाली तर आपला हॉलिडे एकदम मेमोरेबल होऊन जातो. म्हणजे बघा नं आलिशान, शोफर ड्रिव्हन मर्सिडिज मधून तुम्ही तुमच्या रिसॉर्टवरून साइट सीइंगला जाताय... तुमच्या रूमच्या गॅलरीत बसून समोर पसरलेल्या हिमालयाच्या रांगेतील बर्फाने चमकणारी शिखरे बघताय... बेडवर पडल्या पडल्या तुम्ही सागराच्या लाटांचा पियानो ऐकताय.... वाह! क्या बात है ! असा हॉलिडे म्हणजे जणू सेव्हंटी एम एम ड्रीम सिक्वेन्सच. ‘अशी लक्झरी हवी तर युरोपला जायला हवं पण तितका वेळ कुठून आणायचा?‘ असा जर प्रश्न पडला असेल तर काळजी करू नका, आमच्याकडे तुमच्यासाठी एकदम परफेक्ट सोल्युशन आहे. अशा प्रकारच्या आलिशान सोयी सुविधा मिळण्यासाठी फार लांब जायची गरज नाही. आपल्या भारताजवळच अनेक अफलातून ठिकाणी तुम्ही लक्झुरियस हॉलिडे अनुभवू शकता.

नेपाळ, श्रीलंका, भूतान या भारताशेजारच्या देशांमध्ये असलेल्या आरामदायी, आलिशान रिसॉर्टस्‌‍कडे जगभरातील पर्यटक आकर्षित होतात. या देशांना अनुपम निसर्गसौंदर्याचं आणि अनोख्या संस्कृतीचं वरदान तर लाभलेलं आहेच, त्यात इथल्या आलिशान रिसॉर्टस्‌‍ची भर पडली आहे. संपूर्ण एशियामध्ये फक्त श्रीलंकेतच मिरिसा या बीचवरच्या गावाजवळ व्हेल वॉचिंग करता येतं. तुम्ही क्रूझप्रमाणेच छोट्या विमानातून देखिल एरियल व्हेल वॉचिंग करू शकता. श्रीलंकेतील ‘सिगिरिया रॉक फोर्ट्रेस’ या प्राचिन किल्ल्यावरील पुरातन वॉल पेंटिंग्ज बघणे आता सोपे झाले आहे कारण इथे हेलिकॉप्टर राइडची सुविधा आहे. कलोनियल काळातील आरामदायी जीवनाची झलक अनुभवायची असेल तर श्रीलंकेतील नुवारा एलियामधील हिरव्यागार टी इस्टेटमधल्या लक्झरी बंगल्यातही राहता येईल.

अप्रतिम निसर्ग सौफ्लदर्य आणि पुरातन परंपरा जपणाऱ्या भूतान देशात तुम्ही ‘अमान कोरा ’ किंवा ‘सिक्स सेन्सेस’ अशा जगप्रसिध्द रिसॉटर्स्‌ची निवड करून अल्टिमेट लक्झरी हॉलिडे अनुभवू शकता. पारंपारिक ‘भूतानी हॉट स्टोन बाथ’ हा एक घ्यायलाच हवा असा तनामनाला रिफ्रेश करणारा अनुभव. भूतानमधले ऐतिहासिक झाँग असोत किंवा त्यांचे ट्रॅडिशनल उत्सव, प्रत्येक गोष्ट तुम्हाला नेहमीच आश्चर्यचकित करते. नेपाळसारख्या हिमालयाच्या कुशीत वसलेल्या देशातला हॉलिडे म्हणजे जणू ‘हिमालयकी गोद में’ चा अनुभव. तुम्ही पोखरामध्ये रहा किंवा काठमांडूमध्ये, तिथल्या आरामदायी रिसॉर्टस्‌‍मधून अवतीभवतीच्या हिमशिखरांचे दर्शन घेत निवांत हॉलिडे अनुभवता येतो. नेपाळमधल्या चितवन, बार्डिया नॅशनल पार्कमधल्या वाइल्ड लाइफ सफारींमुळे तुमचा हॉलिडे एकदम एक्सायटिंग होऊन जाईल. माउंटन फ्लाइट्स हा अनुभव तुम्ही नेपाळमध्येच घेऊ शकता. सर्वोच्च माउंट एव्हरेस्ट पासून ते इतर उत्तुंग हिमशिखरांपर्यंत हवाई दर्शनाचा आनंद जरूर घ्या. अगदी कैलास पर्वतही ह्या फ्लाइट् मधून दिसतो. एव्हरेस्ट बेस कॅम्प हेलिकॉप्टर टूर सध्या पर्यटकांमध्ये विशेष लोकप्रिय आहे. तर तुमच्या स्वप्नातला अत्यंत लक्झुरियस आणि संस्मरणीय हॉलिडे अनुभवण्यासाठी भारताजवळ हे पर्याय आहेत, वीणा वर्ल्डच्या कस्टमाईज्ड हॉलिडे टीमशी संपर्क साधा आणि आपला हॉलिडे आजच प्लॅन करा.


काय बघावं? कसं बघावं?

 स्पॅनिश मिरॅकल

इसवी सनाच्या पहिल्या शतकात स्पेनमध्ये ख्रिश्‍चन धर्माचा शिरकाव झाला. नंतर युरोपीयन टोळ्यांनी स्पेनमध्ये धुडगूस घातला. आठव्या शतकात मुस्लिम मूर जमातीने स्पेनवर कब्जा केला आणि मुस्लिम धर्माचे वर्चस्व प्रस्थापित केले. सातशे वर्ष सातत्याने स्पेनच्या जनतेने लढा दिल्यावर स्पेनमधील इस्लामी शासन कायमचे संपुष्टात आले ते 1492 मध्ये. हे सगळं होत असताना एकीकडे स्पेनने युरोपमध्ये अनेक देशात आपली सत्ता प्रस्थापित केली होतीच पण युरोपबाहेर साऊथ अमेरिका, सेंल अमेरिका, मेक्सिको, फिलिपिन्स अशा अनेक ठिकाणी आपल्या वसाहती निर्माण केल्या होत्या. सोळाव्या सतराव्या शतकात स्पेन संपूर्ण जगातील एक सामर्थ्यशाली साम्राज्य होतं. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला मात्र स्पेनच्या साम्राज्याला उतरती कळा लागली, इतकी की स्पेनला फ्रान्सचं मांडलिक बनण्याची वेळ आली. लॅटिन अमेरिका, करिबीयन बेटं, एशिया पॅसिफिकमधल्या अनेक वसाहतींवर पाणी सोडावं लागलं. सम्राट फर्डिनंडचा एकछत्री अंमल आणि त्यानंतर जनरल फ्रँकोची हुकूमशाही ह्यातून स्पेन बाहेर आलं आणि 1955 मध्ये युनायटेड नेशन्सचं सदस्यत्व मिळाल्यावर स्पेनचे दिवस पालटले आणि 1960 च्या दशकात स्पेनने अर्थव्यवस्था स्थिरस्थावर केली ज्याला `स्पॅनिश मिरॅकल’ असं म्हटलं जातं. ह्या नंतर स्पेनचं रूपांतर आधुनिक स्पेनमध्ये झालं. 1978 साली नवी घटना मंजूर झाली आणि लोकशाही तत्वावरील राजकीय स्वायत्तता प्रस्थापित झाली. उद्योगधंद्यानी मजबूत अशा अर्थव्यवस्थेला जोड मिळाली पर्यटनाची आणि मग स्पेनने मागे वळून पाहिलंच नाही. फक्त पर्यटनासाठीच नाही तर मायग्रेशनसाठीही जगभरातील लोक स्पेनला स्थलांतरित होताहेत. अमेरिकेनंतर स्पेनचा नंबर लागतो. आतातर स्पेन जगभरातील पर्यटकांसाठी एक अव्वल `मस्ट व्हिजिट’ असं डेस्टिनेशन ठरलं आहे. पिकासो, डाली, मुरो, गोया, डिएगो व्हेलास्कस सारख्या सुप्रसिद्ध आर्टिस्टचा स्पेन, फ्लमेंको शो चा स्पेन, ला टोमाटिनाचा स्पेन, आन्तोनी गावदीचा स्पेन, सागराडा फामिलियाचा स्पेन,  बुलफाइटचा स्पेन, अनेक वर्ल्ड हेरिटेज साइट्सचा स्पेन, ऑलिव्ह ऑइलचं अमर्याद उत्पादन करणारा स्पेन, अप्रतिम निसर्गसौफ्लर्द्याचा स्पेन, फुटबॉल प्रेमिकांचा स्पेन, `सिएस्टा’ म्हणजे वामकुक्षी अनुभवणारा स्पेन, सुशेगाद आयुष्य जगणारा स्पेन, गुडलकसाठी नववर्षाला रात्री बाराच्या ठोक्याला बारा द्राक्ष खाणारा स्पेन, पाएय्या तापासची खाद्यपंरपरा जपणारा स्पेन, आल माद्रिड आणि एफसी बार्सेलोनाचा स्पेन स्पेनला जाण्याची कारणं अनेक, म्हणूनच आम्ही वीणा वर्ल्डने स्पेनच्या वेगवेगळ्या टूर्स आपणसाठी आणल्या आहेत. सो, चलो स्पेन.

June 22, 2024

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top