Published in the Saturday Lokasatta on 04 January, 2025
...काश्मीरला उतरल्या उतरल्या पदरी पडलेलं स्नो ऍडव्हेंचर आम्हाला सुखावत होतं. उद्या फोटोसह सर्वांना सांगता येणार होतं, मायनस सतराला आम्ही पुरून उरलो. डर के आगे जीत है, हे अगदी खरं आहे...
जस्ट तैवानहून आलो होतो, पुढच्या आठवड्यात टांझानियाला जायचं होतं आणि त्यात सुधीरचा ऑस्ट्रेलिया दौरा होता. लिटरली गेले सहा महिने आम्ही जगाच्या ह्या टोकावरून त्या टोकावर पायाला भिंगरी लावल्यासारखा प्रवास करीत होतो. माझा प्रवास टूर टू टूर होता, पण सुधीरला त्यात मधेमधे आय टी बी एशिया, वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट लंडन, अशा एक्झिबिशन्सना वीणा वर्ल्डच्या बूथवर सुनिला आणि टीम सोबत रिप्रेझेंटेशन करावं लागत होतं. टांझानियानंतरचा आमचा हॉलिडे `आमचं घर’ होता आणि आम्ही त्याकडे डोळे लावून बसलो होतो. टूरवर असतानाच काश्मीरचं कॉन्ट्रॅक्टिंग आणि ऑपरेशन्स सांभाळणाऱ्या नियोती ठाकूर आणि शिवांगी कुशवाहाची प्रेमळ रिक्वेस्ट आली, `झूम कॉल वर याल का?’ हल्ली रूटीनमध्ये जास्त काही आम्हाला बघावं लागलं नाही तरीही कधी काही `टू बी ऑर नॉट टू बी’ वाली कन्फ्युझिंग सिच्युएशन आली की अशा रिक्वेस्ट येतात. त्यामुळे मी आनंदाने जॉइन झाले झूम कॉल वर. `बोला, कुठे अडलायत?’ तर हसत हसत म्हणाताहेत, `आम्हाला माहितीय की तुम्ही खूप दमलायत आणि आता घरी यायची स्वप्नं बघताहात...’एवढी प्रस्तावना म्हणजे मी थोडी सावध झाले. `आपल्याला काश्मीरला जायचंय आणि ते आत्ताच जायला हवं. कारण नंतर तुमचं आमचं सर्वांचच शेड्यूल टाइट आहे’. ओह् नो! नॉट अगेन, लेट मी स्टे ॲट होम. म्हणजे काश्मीर इज ऑलवेज अ गुड आयडिया पण अगं तिकडे आता `चिल्लई कलान’ सुरू होईल नं, मायनसवर पोहोचेल पारा. `हाँ, अभी मायनस आठ से मायनस पंधरा के बीच में है टेंपरेचर, लेकिन अभी जानाही पडेगा नहीं तो बहुत देर हो जाएगी।’ शिवांगीने तिच्या गोड हिंदीतून अल्टिमेटम दिला आणि मी मनाने टांझानियातून काश्मीरला पोहोचले. टीमच्या हूकूमबरहूकूम आम्ही मागच्या आठवड्यात मिशन काश्मीर फत्ते करून आलो.
अडीच हजार किलोमीटर्स लांबीच्या हिमालयाचं आपल्या भारतातल्या तेरा राज्यांना (युनियन टेरिटरीज धरून) वरदान लाभलेलं आहे. आज आपण युएसए मेक्सिकोमध्ये सिक्युरिटी वॉल बांधली जाण्याची शक्यता वा चर्चा ऐकतो, पण आपल्या भारताच्या उत्तरेला विस्तीर्ण पसरलेला हिमालय एखाद्या भरभक्कम भिंतीप्रमाणे आपली रक्षा करतोय, शतकानुशतके... यासाठी देवाचे आणि हिमालयाचे आभारच मानायला हवेत. कारण हिमालयाचा जास्तीत जास्त भाग हा भारताला मिळाला आहे आणि भारतातल्या जम्मू काश्मीर राज्याला त्यातला चाळीस टक्यांपेक्षा जास्त भाग मिळालाय. काश्मीरच्या सौफ्लदर्यांला चार चाँद लागलेत ते हिमालयामुळेच आणि त्यातून निर्माण झालेल्या नद्या सरोवरांमुळे. कितीही संकटं आली, अतिरेकी कारवाया झाल्या, निसर्गाचा कोप झाला, नव्वदीत अगदी चौदा वर्षं काश्मीर बंद राहिलं तरीही काश्मीर कधी नामोहरम झालं नाही. अर्थात त्यात मोठा भाग आपला सर्वांचाही आहे. आपण कधी काश्मीरला दुर्लक्षिलं नाही. जेव्हा जेव्हा संधी मिळाली तेव्हा तेव्हा आपण काश्मीरला जात राहिलो. गेल्या आठ-दहा वर्षांत तर काश्मीरमध्ये आमूलाग्र बदल घडवून आणले सध्याच्या सरकारने. त्यासाठी सरकारला धन्यवाद द्यायलाच हवेत. आज जगातल्या सुप्रसिद्ध हॉटेल चेन्स काश्मीरमध्ये दाखल झाल्यायत. काश्मीर बदललंय आणि म्हणूनच आम्ही काश्मीरमध्ये दाखल झालो, `काश्मीर फॉर एव्हरीवन’ चा नारा घेऊन.
श्रीनगरमध्ये विमान उतरताना पायलटने अनाउंस केलं, `वेलकम टू कश्मीर, बाहर का तापमान मायनस आठ डिग्री सेल्सियस है।‘ मी म्हटलं, `ऐसे ही हमें वापस लेके चलो।’ एअरहॉस्टेस हसायला लागली. एकंदरीतच आम्ही बसल्या जागी कुडकुडायला लागलो. आमची ही बिझनेस ट्रिप होती, वीणा वर्ल्डच्या फुल्ली लोडेड टूर सारखीच. एवढ्या थंडीत हॉटेलला जाऊन मस्त, मुलायम पश्मिनाच्या दुलईत लोळूया असं म्हणण्याची किंवा त्या स्वप्नामध्ये हरखून जाण्याची काय बिशाद. दूर दूर तक वह संभावना नजर नहीं आ रही थी आणि एअरपोर्टवरचं मायनस आठ डिग्री कमी होतं की काय तर आमचं पहिलं डेस्टिनेशन होतं सोनमर्ग. सोनेरी सोनमर्ग पूर्ण बर्फमय झालं होतं. उतरल्या उतरल्याच कळलं, सोनमर्ग मायनस सतरा डिग्रीज. वाह्! अब आएगा मजा! मजल दरमजल करीत कारमधून फोर व्हिलर जीपमध्ये, जीपमधून टायर्सना चेन लावलेल्या जीपमध्ये अशा प्रकारचा प्रवास करीत आम्ही सोनमर्गला आमच्या हॉटेलमध्ये पोहोचलो. सभोवताली अगदी हॉटेलच्या बाहेरही एक-दीड फूट बर्फ. आम्ही हॉटेलमध्ये पोहोचल्या पोहोचल्या एकावर एक, एकावर एक करीत लेअर्ड वुलन क्लोदिंगमध्ये आम्हाला बंदिस्त केलं. आइसलँडला घेतलेले, ग्रीनलँडच्या बर्फात वापरलेले कपडे, आपल्या भारतात वापरायला मिळाल्याचा आनंद झाला. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट. चेनवाल्या जीपचा ड्रायव्हर म्हणाला, `तुम्ही तयार व्हा. मी अर्ध्या तासात तुम्हाला घ्यायला येतो.’ आम्ही तयारी करून रिसेप्शनला वाट बघतोय, पण गाडी आलीच नाही. त्याचा फोन आला गाडी वर येऊ शकत नाही. चेन असली तरी चाकं घसरताहेत. `स्वीकार लो’ चा प्रचंड पगडा आमच्यावर, त्यामुळे आम्ही अतिउत्साही मंडळी पायी चालत बर्फातून निघालो आमच्या सोनमर्गमधल्या सर्व हॉटेलियर्सना भेटायला. वेळ नव्हता, कारण दुसऱ्या दिवशी पहलगामला कूच करायचं होतं. पुढचे अडीच ते तीन तास आम्ही सोनमर्गच्या बर्फात हुंदडलो. आमचं प्रत्येक पाऊल आम्ही अगदी विचारपूर्वक टाकत होतो. जिथे चेन लावलेली गाडी घसरत होती, तिथे आमच्या पायांची काय बिशाद न सरकण्याची. आम्ही हळूहळू सरावलो, वातावरणाला आणि बर्फालाही. एकदा भिती संपली, आत्मविश्वास वाढला की असेल ती परिस्थिती आपण एन्जॉय करायला लागतो, आमचंही तसंच झालं. काश्मीरला उतरल्या उतरल्या पदरी पडलेलं स्नो ॲडव्हेंचर आम्हाला सुखावत होतं. उद्या फोटोसह सर्वांना सांगता येणार होतं, 'मायनस सतराला आम्ही पुरुन उरलो, डर के आगे जीत है, हे अगदी खरं आहे‘. तुम्हीही या आणि सोनमर्गचा हा ‘स्नो व्हाइटनेस' अनुभवा.
सोनमर्गवरून पहलगामला पोहोचलो. तिथे स्नो फॉलला जस्ट सुरुवात झाली होती. अर्थात आता आम्ही ॲक्लमटाइज झालो होतो. ‘तुमची आवडती जागा कोणती?‘ असं विचारल्यावर माझी पंचाईत होते. कारण प्रत्येक ठिकाण वेगळं आहे. हिमालयातलंच असलं तरीही लडाख, भूतान, नेपाळ, अरुणाचल, आसाम, मसूरी, नैनिताल, ह्या प्रत्येक हिल स्टेशनचा चार्म वेगळा आहे. पण तरीही मनाली आणि पहलगाम कुठेतरी वरच्या नंबरवर असतात माझ्या लिस्टमध्ये, दोन्हीकडे मी टूर मॅनेजर म्हणून अनेक वर्षं काम केल्यामुळे असेल! ह्यावेळी पहलगामच्या आमच्या माऊंट व्ह्यू हॉटेलच्या गार्डनमध्ये लीडर नदीकडे बघत काश्मिरी काहवा घेण्याची मजाच काही और होती. पहलगामला टूरच्या कॅटॅगरीवाइज अगदी रॅडिसन गोल्फ कोर्स पासून बेसिक हिलपार्क महाराजा पर्यंत जी हॉटेल्स आम्ही ग्रुपसाठी घेतो ती सगळी पालथी घातली. एकच दिवस तिथे होतो तरीही रात्री पहलगामच्या मेन स्ट्रीटवर थोडावेळ फिरलो, विंडो शॉपिंग केलं. एकोणीसशे ऐंशी पासून मी काश्मीरला जातेय पण कधीही 'इनफ ऑफ इट' असं वाटलं नाही. ‘फिर मिलेंगे, अगले साल थोडा टाइम निकाल के आएँगे' असं म्हणत आम्ही पहलगामला बाय बाय म्हणत श्रीनगरकडे कूच केलं. आता चार दिवस आमचा मुक्काम एकाच ठिकाणी असल्याने थोडंसं हुश्श झालं होतं. कामं होतीच, पण तरीही रोजचं चेक इन चेक आऊट नव्हतं. काश्मिरी कार्पेट्स, सूट्स, पर्सेस, पेपर मॅशे...हॅंडीक्राफ्ट्सनी भरलेली दुकानं खुणावत होती, पण नियोती आणि शिवांगी आमच्यासोबत हॉटेल हॉटेल खेळत होत्या. शेवटी त्यांना म्हटलं, ‘काश्मीर में सिर्फ हॉटेल्स होते हैं' हे इम्प्रेेशन घेऊन आम्हाला पाठवायचं नसेल तर किमान एक तास तरी द्या आम्हाला, जरा मार्केटमध्ये हिंडू द्या. काश्मीरच्या इकॉनॉमीला थोडा हातभार तर लावू द्या. अखेर शेवटच्या दिवशी पोलो मार्केटमध्ये एक तासाचा वेळ आम्हाला मिळाला आणि आम्ही चिंटू मिंटू शॉपिंग करून तृप्त झालो.
चार दिवसांत काश्मीरचीही सर्व हॉटेल्स आम्ही पालथी घातली. ट्रान्स्ापोर्टर्सना भेटलो आणि ‘मिशन काश्मीर‘ पूर्ण करून मुंबईत ‘होम स्वीट होम‘ ला परत आलो. काश्मीरमध्ये आता पाच दिवसांपासून नऊ दिवसांपर्यंतच्या वेगवेगळ्या टूर्स आहेत. कुणाला एकाच हॉटेलमध्ये राहून रोज एक्स्कर्शन्स करायची असतात, तर कुणाला अगदी सोनमर्ग, गुलमर्ग, पहलगाम अशा प्रत्येक ठिकाणी रहायचं असतं. कुणाला हाऊसबोट्स आवडतात, तर कुणाला त्या दुरून डोंगर साजरे वाटतात. कुणाला बेसिक हॉटेल्स चालतात, तर कुणाला अगदी फोर फाइव्ह स्टार सारखी लक्झरी हॉटेल्स ग्रुप टूर्स मध्ये हवी असतात. कुणाची ‘वुमन्स स्पेशल काश्मीर‘ टूरसाठीही अशी वेगवेगळ्या हॉटेल कॅटॅगरीची डिमांड असते, तर सिनियर्सपण ‘हम भी कुछ कम नहीं' म्हणत पुढे येतात. हाच मुद्दा होता आमच्या ह्या ‘मिशन काश्मीर' टूरचा. तो यशस्वी झाला आणि आम्ही 'काश्मीर फॉर एव्हरीवन' घेऊन सज्ज झालो आमच्या पर्यटकांसाठी आणि त्यांच्या समर व्हेकेशनसाठी. ग्रुप टूर्सना भरपूर डिमांड असली तरीही कस्टमाईज्ड, अगदी तुम्हाला हवा तसा काश्मीर हॉलिडे देण्यासाठीही टीम तयार आहे आणि काश्मीरच्या कॉर्पोरेट माइस टूर्स तर मागच्या आठवड्यात आम्ही गेलो तेव्हाही तिथे सुरू होत्या. आता येतोय ‘व्हॅलेन्टाइन्स डे‘, तेव्हा तुम्हीही आमच्यासारखी थंडी अनुभवण्यासाठी काश्मीरला जाऊ शकता. त्यानंतर ‘वुमन्स स्पेशल काश्मीर‘आहेच, त्यातील काही टूर्स फुल्ल झाल्यासुद्धा. परवाच ‘वुमन्स स्पेशल‘ टूरची डोंबिवलीची गेस्ट स्नेहा तेलगेचा मेल आला. ‘आम्हाला आठ दिवसांची टूर हवीय, पहिली टूर फूल झालीय, दुसरी लावा नं.‘ तिला ख्रिसमस गिफ्ट हवी होती ही ॲडिशनल टूर. आम्हीही हा रिस्पॉन्स ॲन्टिसिपेट केलाच होता आणि काश्मीरहून येतानाच आम्ही त्याची प्रोव्हिजन करून आलो होतो. त्यामुळे स्नेहाला सांगावसं वाटतं,‘इफ वुई कॅन, वुई विल, डेफिनेटली!‘
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.