Published in the Sunday Sakal on 19 January 2025
जानेवारी महिना म्हणजे बिझी महिना, कोणतेही कष्टं न घेता नवंकोरं वर्ष आपल्या पदरात पडलेलं असतं. त्यामुळे या नवीन वर्षात नक्की काय करायचं याबद्दलचं द्वंद्व मनात सुरू असतानाच पहिले पंधरा वीस दिवस कसे निघून जातात कळतच नाही. आत्तापर्यंतच्या अनेक न्यू इअर रिझॉल्यूशन्सचं स्टॅटिस्टिक्स किंवा डेटा बघता किंवा रिझॉल्यूशन्सची लागलेली वाट बघता रिझॉल्यूशन्स करायची नाहीत या निर्णयाप्रत मी बऱ्यापैकी पोहोचले. तरीही एक दोन गोष्टी सुरू करण्याची खुमखुमी ही येतेच. तसं मी ठरवलंय माझ्यासाठी ते एकच. उद्या काय करायचं तेवढंच अगदी थोडक्यात आदल्या दिवशी लिहायचं, उद्या रात्री त्यावर टिकमार्क करायची आणि अचिव्हमेंटचा आनंद घ्यायचा. आता या पंधरा दिवसात या रिझॉल्यूशनचा माझा स्कोअर फिफ्टी फिफ्टी आहे. अर्थात आपल्याला मिळालेल्या प्रत्येक दिवसांच सोनं करायचं, प्रत्येक क्षणाला सकारात्मक गोष्टी आणि विचार याचाच पाठपुरावा करायचा याची बऱ्यापैकी सवय लागल्याने आता वेळ वाया जात नाही किंवा `आता काय करू बरं?’ असा प्रश्नही पडत नाही. एकापाठी एक कामं स्वागताला तयार असतात आणि मीही मनापासून त्यामध्ये झोकून देते. एकावेळी शक्यतो एक काम, त्यामुळे लक्ष विचलित न होता फोकस्ड पद्धतीने काम केल्याने अदरवाईज लागणाऱ्या वेळेपेक्षा कमी वेळात आणि चांगल्या पद्धतीने पूर्ण होतं. शिवाय एक काम हवं तसं वेळेत पूर्ण झालं की दुसरं काम हाती घेताना मन अधिक उत्साहाने त्याला सामोरं जातं आणि तेही काम तेवढ्याच छान पद्धतीने पूर्ण होतं. ही अशी छोट्या छोट्या अचिव्हमेंटची मस्त साखळी जोडण्याची सवय लागली की मग प्रत्येक तासाचं, दिवसाचं, महिन्याचं, वर्षाचं आणि आयुष्याचं सोनं व्हायला लागतं. मन आनंदी-उत्साही असलं की शरीर तंदुरुस्त राहतंच त्यामुळे मनाला थोडं गोफ्लजारायची त्याकडे लक्ष द्यायची गरज आहे.
तर हा जानेवारी महिना एप्रिलमध्ये सुरू होणाऱ्या नव्या फायनान्शियल इयरच्या तयारीला लावतो. स्ट्रॅटेजायझिंग, बजेटिंग, प्लॅनिंग यामध्ये किमान पंचवीस टक्के वेळ द्यावा लागतो सर्वांनाच. प्रत्येक डिपार्टमेंट हातातली कामं करतानाच नजीकच्या भविष्यकाळाचा विचार करीत असतात, सॅलरी रिव्हीजचाही हाच महिना. गेल्या वर्षभरात जे काही केलं त्याचं मोजमाप किंवा मेहेनताना वर्षाच्या सुरूवातीलाच मिळाला तर तिथेही उत्साह वाढू शकतो आणि तसं नाही झालं, उदासी आली किंवा अन्याय झाला असं वाटलं तरीही पुढे काय करायचं यासाठी नवीन वर्षात नवीन महिन्यासारखी दुसरी वेळ नाही. कधी कधी मागे वळून पाहणं, आपल्याकडे आपणच परिक्षक बनून बघणं, आपल्याला जोखणं गरजेचं असतं. आणि तसं शक्य नसेल तर मग दुसरीकडे शोधाशोध करण्यासाठीही ही वर्षातली चांगली वेळ असते. स्वतःला खेचत, ऑर्गनायझेशनला दोष देत खितपत पडायचं नाही. `इस पार या उस पार’ निर्णय घेता आले पाहिजेत. या महिन्यातील तिसरी महत्वाची गोष्ट आमच्यातल्या अनेकांना बिझी ठेवते ती म्हणजे टूर मॅनेजर्सचं इयरली इव्हॅल्युएशन.
सध्या वीणा वर्ल्डकडे तीनशे पंचाहत्तर टूर मॅनेजर्स आहेत. जे पर्यटकांना देशविदेशात टूर्स घडवत असतात. त्यामध्ये भर पडते ती जानेवारी फेब्रुवारी महिन्यात. नवीन चांगले टूर मॅनेजर्स वीणा वर्ल्डच्या पठडीत आणि शिस्तीत बसणारे असतील तर त्यांना एन्ट्री दिली जाते आणि पर्यटनक्षेत्रात यायला उत्सुक असलेल्या तरुणांसाठी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या रविवारी वॉक इन इंटरव्ह्यूचा मोठा प्रयोग केला जातो. यावर्षीही नऊ फेब्रुवारीला `वॉक इन इंटरव्ह्यू' आहे, टूर मॅनेजर्स आणि अस्टिटंट टूर मॅनेजर्स या पदांसाठी, तुमच्या संपर्कात आजूबाजूला कुणी पर्यटनवेडी तरुणाई चाचपडत असेल तर जरूर पाठवा त्यांना. 'टुरिझम इज गोईंग टू बी ॲन इम्पॉर्टंट इंडस्ट्री इन फ्युचर' देश पातळीवर सरकार त्यावर किती जोर देतंय हे आपल्याला दररोज दिसतंच आहे. कोविड हा सेटबॅक सर्वंकष असला तरी सर्वात जास्त होरपळली ती टुरिझम इंडस्ट्री. पण आज चित्र पूर्णपणे पालटलंय. टुरिझम जेवढं मागे फेकलं गेलं, त्याच्या दुप्पट वेगाने पुढे येतंय. गेल्या दोन-तीन वर्षांत तरुणाई टुरिझममध्ये यायला कचरत होती, कोविडचा इम्पॅक्टच इतका होता की अनेकांनी ह्या इंडस्ट्रीकडे पाठ फिरवली. त्यात त्यांचं काही चुकलं नाही असंच मी म्हणेन. अर्थात गेले आठ-दहा महिने हे चित्र पालटताना दिसतंय. नवीन टॅलेंट वेगाने टुरिझमकडे आणि आमच्याकडेही यायला लागलंय. कॉर्पोरेट ऑफिसमध्ये जागा कमी पडायला लागलीय. कोविडमध्ये एवढ्या जागेचं काय करायचं म्हणून एका फिनटेक कंपनीला भाड्याने दिलेला आमचा एक मजला दोन महिन्यांपूर्वी परत मिळाला हे ही नशीबच..
योग्य वेळी जागेची सोय झाली. काम करण्यासाठी जागा जेवढी चांगली, सुव्यवस्थित तेवढं काम चांगलं होतं यावर माझा विश्वास आहे आणि अनुभवही! घरात आपण म्हणतो नं की, प्रत्येक गोष्टीला जागा आणि जागेवर प्रत्येक गोष्ट असली की ते घर सुनियोजित आणि आनंदात असतं, तसंच मला ऑफिसच्या बाबतीतही वाटतं. प्रत्येक माणसाला जागा आणि ठरलेल्या जागेवर प्रत्येक माणूस असेल तर एफिशिअन्सी आणि इफेक्टिव्हनेस वाढतोच वाढतो.
आमच्याकडे वीणा वर्ल्डमध्ये टूर मॅनेजर्स इव्हॅल्यूएशन ही कंटिन्यूअस कंसिस्टन्ट प्रोसेस आहे. कधी वन टू वन मीटिंगद्वारे, कधी झूम कॉलद्वारे, कधी ऑडिओ मेसेजद्वारे तर कधी ग्रुपसेटिंगद्वारे हे इव्हॅल्यूएशन चालू असतं. ग्रुप इव्हॅल्युएशनचा महिना असतो तो हा जानेवारी! दररोज आम्हाला पंधरा ते वीस टूर मॅनेजर्सना इव्हॅल्युएट करायचं असतं आणि आम्ही सर्वजण उपस्थित असतो. रोजचे चार तास ह्यासाठीच, कारण प्रत्येक टूर मॅनेजर महत्वाचा आहे, त्याचं करियर महत्वाचं आहे. सर्वसाधारणपणे टूर मॅनेजर बनून जगाची भ्रमंती करण्याऱ्या, सातही खंडांना गवसणी घालणाऱ्या टूर मॅनेजर्सची वाटचाल ही कष्टाची असते. आम्हीही आमच्या करियरच्या सुरुवातीच्या काळात टूर मॅनॅजर्सच होतो, त्यामुळे आम्हाला पूर्ण कल्पना आहे की टूर मॅनेजरच्या इतरांना आकर्षक वाटणाऱ्या करियरच्या पाठी किती मेहनत आहे.
वीणा वर्ल्ड एक्स्पर्ट टूर मॅनेजर हा त्याच्या वा तिच्या सुरुवातीच्या काळात असिस्टंट टूर मॅनेजर म्हणून जॉईन होतो भारतातल्या टूर्ससाठी! तिथे किमान दोन ते तीन वर्ष तावून सुलाखून निघाल्यावर अशाच एखाद्या वर्षीच्या जानेवारीमध्ये इव्हॅल्युएशनसाठी त्याला आमच्या समोर यायचं असतं. ह्या इव्हॅल्युएशनला मी 'ऑडिशन' असंही म्हणते कारण एखाद्या कलाकाराप्रमाणेच आम्ही टूर मॅनेजरची परीक्षा घेत असतो वा परीक्षण करीत असतो. त्या क्षणी तिथे उभी असलेली व्यक्ती कशी दिसते? म्हणजे रूप आपल्या हातात नसलं तरी स्मार्टनेस, नीटनेटकेपणा, नम्रपणा, चेहऱ्यावरचं हास्य, उभं राहण्यातला उत्साह आणि आत्मविश्वास ह्या प्रथमदर्शनी गोष्टींचं परीक्षण होतं. दुसरी पारखण्याची गोष्ट असते ती आवाज. तो सुस्पष्ट, खणखणीत सर्वांना ऐकू जाईल असा आहे का? आवाजानंतर येतं ते बोलणं, सुसूत्रता, ताळमेळ, मॉड्युलेशन, विषयाला धरून बोलण्याची सवय आहे का? इत्यादी गोष्टी. बोलण्यानंतर येतं ते ज्ञान! नुसती पोपटपंची आहे की खरोखरच अभ्यास केलाय दिलेल्या विषयाचा, ते बघितलं जातं. त्यातही एक दोन टूर मॅनेजर्स फारच छान ऑडिशन देतात. इतरांपेक्षा स्वतःचं वेगळेपण सिध्द करण्याचा चान्स ते सोडत नाहीत. शेवटी आजच्या जगातली सर्वात मोठी लढाई ही डिफ्रन्सिएशनचीही आहेच, या आठवड्यात असा वेगळेपणा लक्षात राहिला तो ‘धवल छाटबार’चा, त्याने चक्क माओरी डान्स करून दाखवला. त्याच्या उत्कृष्ट कॉमेंट्रीची सांगता झाल्यावर त्याची ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडसाठी निवड झाली नसती, तरच नवल.
सो एवढं सगळं त्या टूर मॅनेजर वा असिस्टंट टूर मॅनेजरने व्यवस्थित पार पाडलं की अपग्रेड केलं जातं पुढच्या लेव्हलला, ह्या लेव्हल्स असतात पुढीलप्रमाणे. सर्वप्रथम भारतातल्या सहलींवर असिस्टंट टूर मॅनेजर, नंतर टूर मॅनेजर, नंतर साऊथ ईस्ट एशिया टूर मॅनेजर, नंतर फार ईस्ट एशिया टूर मॅनेजर त्यानंतर ऑस्ट्रेलिया न्यूझीलंडचा टूर मॅनेजर आणि त्यानंतर युरोप अमेरिका अगदी सप्तखंडात संचार सुरु होतो ह्या टूर मॅनेजर्सचा. टूर मॅनेजर्स आणि आम्ही ट्रेनिंगवर इतकी मेहनत घेतो कारण ह्या सगळ्याचा एन्ड रिझल्ट हा पर्यटकांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि सहल सुखरूप पार पडल्याचं समाधान ह्यात असतो.
वीणा पाटील, सुनीला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे प्रत्येक आठवड्यात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्डच्या वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरिता उपलब्ध आहेत.
देखो अपना देश
दिल से! प्यार से!सम्मान से!
केरळ म्हटलं की आपल्याला आठवतात ते इडली, डोसा, सांबार, अप्पम हे खास साऊथ इंडियन पदार्थ. याशिवाय पुट्टू आणि कडला करी, पायसम, पायम पोरी, मलबार बिर्याणी हे पदार्थही या प्रदेशाची खासियत आहेत. वास्को द गामाने भारतात पहिलं पाऊल केरळमधल्या कोझिकोड या ठिकाणी ठेवलं होतं असं म्हणतात. ‘केर’ या मल्ल्याळम भाषेतल्या नारळीच्या नावावरून या प्रदेशाला केरळ नाव पडलं असावं. प्राचीन काळी ही भूमी काही नैसर्गिक कारणांमुळे समुद्रातून वर आल्याचं मानतात. शिवाय परशुरामाने परशू भिरकावून, समुद्र हटवून केरळची निर्मिती केली अशीही केरळच्या उत्पत्तीबद्दलची आख्यायिका आहे. असं हे केरळ राज्य इथल्या शांत, स्वच्छ आणि निर्मळ समुद्र किनाऱ्यांसाठी प्रसिद्ध आहे. कोवल्लम बीच, कन्नुरचे निर्जन शांत किनारे, हव्वा, वरकाळा, मरारी आणि बेकल बीच असे अनेक बीचेस केरळमध्ये आहेत. हे बीचेस लाइट हाऊसच्या सोबतीने आणखीनच खास झालेत. यापैकी अलेप्पुझा लाइट हाऊस दीडशे वर्षं जुनं आहे. शिवाय कोवल्लममध्ये असलेलं विझिंझाम लाईटहाऊस हे सर्वात उंच आहे. केरळमधलं प्रसिद्ध स्थळ म्हणजे तिरुअनंतपुरम्. हा शब्द तिरु अनंत पुरम् या मल्ल्याळम् शब्दापासून आला आहे. ज्याचा अर्थ आहे भगवान अनंताचे शहर. अनंत हा सर्प शेष आहे असं मानतात. ज्यावर हिंदू देव पद्मनाभ (भगवान विष्णूंचं एक रूप) विसावले आहेत. हे पद्मनाभस्वामी मंदिर दक्षिण भारत आणि देशातल्या प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. केरळमधील वायनाड हे हिल स्टेशन आहे. तर मुन्नार प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक आहे. इथे उत्तम प्रतीच्या चहाचं उत्पादन होतं. इथले उंचच उंच डोंगर आणि त्यावरून वाहणारे ढग हे चित्र तुमच्या मनात कोरलं जाईल. केरळ पर्यावरणदृष्ट्या वैविध्यपूर्ण आहे. त्यामुळे ते इको टुरिझमला चालना देतं. इथे नॅशनल पार्क्स किंवा बॅकवॉटर पाहण्यासाठी अनेकजण येतात. इथल्या धार्मिक आणि अध्यात्मिक वास्तू तुम्हाला भारताच्या भूतकाळात डोकावण्याची संधी देतात. सर्वदूर पसरलेले समुद्र किनारे, हिरवीगार हिल स्टेशन्स, आयुर्वेदिक हेल्थ हॉलिडेज आणि खास केरळी खाद्यसंस्कृती या सगळ्याचा आस्वाद घ्यायचा तर केरळला जायलाच हवं.
अरेच्चा! हे मला माहीतच नव्हतं...
असं म्हणतात की एखाद्या राज्याचं सौंदर्य पाहायचं असेल तर तिथल्या गावाचं सौंदर्य आधी पहायला हवं. भारतात अशी अनेक गावं आहेत ज्यांचं सौंदर्य पहायला देशाच्या कानाकोपऱ्यातून पर्यटक भेट देतात. यातलंच एक म्हणजे लेहमधलं तुर्तुक हे गाव. या गावाला आजवर आपण शेवटचं गाव मानत आलो. पण आपल्या माननीय पंतप्रधानांनी मात्र या गावाला भारतातल्या पहिल्या गावाचा दर्जा दिला. असं हे गाव वसलंय लडाखच्या लेह जिल्ह्यात श्योक नदीच्या डाव्या तीरावर. लेहपासून सुमारे 205 किलोमीटर्स अंतरावर असलेलं हे सुंदर गाव लडाखच्या टोकाला नुब्रा व्हॅलीजवळ आहे. या गावाचा इतिहास मोठा रंजक आहे. 1971 च्या युध्दापर्यंत हे गाव पाकिस्तानच्या ताब्यात होतं. पण युद्ध संपलं आणि भारतीय लष्कराने हे गाव आपल्या ताब्यात घेतलं. त्यामुळे आज हे भारताचा भाग आहे. तुर्तुक गाव हे काराकोरम पर्वतरांगांनी वेढलेलं अद्भुत आणि सुंदर गाव आहे. या गावात राहत असताना रात्रीच्या वेळी निळ्या आकाशाच्या खाली स्फटिकासारखे दिसणारे स्वच्छ नितळ पाणी आपल्याला मोहित करते.
हे गाव जसं सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे तसंच ते ॲडव्हेंचर्ससाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. अनेक लोक या गावात ट्रेकिंगसाठी येतात. बर्फवृष्टीच्या काळात तर हे गाव आणखी सुंदर दिसते. या गावात बाल्टी संस्कृतीचे लोक राहतात. तुर्तुक गावापासून हाकेच्या अंतरावर एका उंच अशा टेकडीवर एक बौद्ध मठ सुध्दा आहे. या ठिकाणाहून हिरव्यागार तुर्तुकचं सुंदर दृश्य पहायला मिळतं. या गावात आपल्याला भारत आणि पाकिस्तानचे बंकर पहायला मिळतात. याशिवाय दुर्बिणीतून पाहिलं तर आपल्याला पाकव्याप्त काश्मीर सुद्धा दिसतं. या गावात हेरिटेज हाऊस आणि बाल्टी संग्रहालय आहे. इथल्या बाल्टी संस्कृतीच्या लोकांची जीवनशैली, त्यांचा पोशाख, त्यांची खाद्यसंस्कृती, भाषा, विवाह परंपरा यासारख्या अनेक गोष्टी इथे आपल्याला पहायला मिळतात. तुर्तुकला हिवाळ्यात खूपच थंडी असते. शिवाय इथे जोरदार बर्फवृष्टी सुद्धा होते. त्यांची बाल्टी भाषा ही लडाखी बोली भाषेशी मिळतीजुळती आहे. इथल्या लोकांच्या उपजीविकेचे मुख्य साधन शेती हे आहे. इथे एवढी शेती आहे की या ठिकाणी पहिल्यांदा येणाऱ्या पर्यटकांना आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. तुर्तुक गावाजवळ एक नैसर्गिक फ्रीज आहे जो 30 अंश सेल्सिअस तापमानातही पाणी गोठवून ठेवतो. दरवर्षी 21 मार्च रोजी इथे बाल्टीस्तान उत्सव मोठ्या आनंदाने साजरा केला जातो. या वेळी नृत्य आणि संगीताचा आस्वाद घेता येतो. या महोत्सवाचं मुख्य आकर्षण असतं ते म्हणजे पोलो सामना. स्थानिक लोक त्यांचा काबाई म्हणून ओळखला जाणारा पारंपरिक पोशाख परिधान करून खेळतात. अशा या पहिल्या गावाला म्हणजेच तुर्तुकला तुम्हाला भेट द्यायची असेल तर चला वीणा वर्ल्डसोबत.
वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल मिशन - 100 Country Club
पर्यटनाचा आनंद
आपल्या रोजच्या काहीशा कंटाळवाण्या आणि दमवणाऱ्या रुटीनमधून खऱ्या अर्थाने सुटका हवी असेल तर पर्यटनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही. मी माझ्या आईबरोबर जगभरातल्या वेगवेगळ्या देश-प्रदेशांना भेट देतो ते याचसाठी. आमच्यासाठी पर्यटन म्हणजे आराम आणि आनंद. आज वयाच्या पंच्याहत्तरीमध्येही माझी आई नवनवीन देशांना, ठिकाणांना भेट द्यायला उत्सुक असते, कारण पर्यटनामुळे मिळणारा आनंद तिला रिफ्रेश करतो. मला वन्यजीवांचं आकर्षण असल्यानं पर्यटनाच्या निमित्ताने निसर्गाच्या अधिक जवळ जाण्याची संधी मिळते आणि त्यामुळेच मी पर्यटनासाठी कायम तयार असतो. आमच्या या छंदाला मदत आणि सोबत आहे ती वीणा वर्ल्डची. त्यांची आपुलकीची सेवा आणि परिपूर्ण नियोजन यामुळे आम्ही कायम वीणा वर्ल्डसोबत पर्यटन करणं पसंत करतो. आजपर्यंत आम्ही जगातील 18 देश आणि भारतातील 31 राज्यांना भेट दिली आहे.
आम्ही दरवर्षी साधारण एक किंवा दोन सहली करतो. त्यासाठी आम्ही एक यादीच तयार केली आहे. गेल्या वर्षी आम्ही साऊथ आफ्रिकेला भेट दिली आणि आता या वर्षी केनिया म्हणजे तिथलं ‘ग्रेट मायग्रेशन’ बघायला जाऊ. भूतानचं अप्रतिम निसर्गसौंदर्य आणि जपानचा समृध्द सांस्कृतिक वारसा पहायला आम्ही अतिशय उत्सुक आहोत. आजपर्यंत पाहिलेल्या देशांमधील व्हिएतनाम आणि कंबोडिया आम्ही विसरू शकत नाही. मला स्वतःला व्हिएतनाममधील अतिशय स्वच्छ शहरं आणि तिथले उत्तम रस्ते आवडले. उच्च दर्जाच्या इन्फ्रास्ट्रक्चरमुळे तिथलं स्थलदर्शन अतिशय सुखकारक झालं आणि मला फोटोग्राफीचा शौकही पुरा करता आला.
माझ्या आईचं आवडतं डेस्टिनेशन दुबई आहे. तिथल्या वैविध्यपूर्ण पर्यटन आकर्षणांची मजा तिनं मनापासून लुटली. बुर्ज खलिफा, पाम जुमेराह, दुबई मॉल, बुर्ज अल अरब, दुबई फ्रेम अशा आयकॉनिक जागांमुळे दुबईची सहल तिच्यासाठी अगदी अविस्मरणीय झाली. आता तिची एकच इच्छा आहे, अयोध्येचं श्रीराम मंदिर बांधून पूर्ण झाल्यानंतर तिला पुन्हा एकदा तिथं जाऊन प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्यायचं आहे. आम्हाला दोघांना जगभरात पाहिलेल्या ठिकाणांची आठवण म्हणून ठिकठिकाणी मिळणारे फ्रिज मॅग्नेट्स घरी आणायला आवडतं आणि तिथल्या आठवणींमध्ये आम्ही रमून जातो.
अनंत मूर्ती सोबत त्यांच्या आई शांता मूर्ती, पुणे
प्राइव्हेट हॉलिडे आयडियाज्
वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्सोबत
फ्रेंड्स, लग्नाचा हंगाम सुरु आहे आणि शिवाय व्हॅलेन्टाईन्स वीक जवळ येतोय. फेब्रुवारी महिना म्हणजे प्रेम साजरं करण्याचा महिना. तेव्हा या रोमँटिक दिवसांसाठी तुम्ही काही खास प्लॅन करताय की नाही ?
विचार करा, तुमचं प्रेम सेलिब्रेट करायला तुम्ही आयफेल टॉवर वरच्या एक्सक्लुझिव्ह रेस्टोरंट्समध्ये जाणार आहात आणि तिथे जेवणाचा आस्वाद घेत ‘सिटी ऑफ लव्ह’ चा पॅनोरॅमिक व्ह्यू पाहणार आहात किंवा ‘माऊंटन्स ऑर बीचेस’ मध्ये तुमचं उत्तर जर बीचेस असं असेल तर ऑस्ट्रेलियाच्या सर्वात जास्त निसर्गरम्य अशा किनारपट्टीवर म्हणजेच ग्रेट ओशन रोड वर तुम्ही जाताय आणि संस्मरणीय अशा सेल्फ ड्राइव्हचा अनुभव घेताय, नाहीतर आयकॉनिक ग्लेशिअर्स एक्सप्रेस मधून तुम्ही प्रवास करताय आणि जगातल्या सर्वात निसर्गरम्य ट्रेन प्रवासाचा अनुभव घेताय. या प्रवासादरम्यान तुम्ही विविध निसर्गरम्य दृश्यांचा आनंद घेताय आणि डोंगररांगांच्या कुशीतून प्रवास करताय. या रेल्वेच्या एक्सेलन्स क्लासमध्ये मिळणाऱ्या तितक्याच उत्कृष्ट सुविधा अनुभवताय आणि तुमचे क्षण खास बनवताय. किती रम्य कल्पना आहे ना? किंवा जर तुम्हाला भारतातच कुठे जायचं असेल आणि त्यातही तुम्ही कॉफी लव्हर असाल, तुम्हाला निसर्गाची ओढ असेल तर कूर्गमधलं ट्री हाऊस आणि कॉफी प्लांटेशन इज ऑल्सो अ गुड ऑप्शन.
जर तुम्हाला रोमान्स आणि थ्रिल एकाच वेळी अनुभवायचं असेल तर टर्कीमध्ये कॅपेडोशिया इथे जायचा प्लॅन नक्की करा. हॉट एअर बलूनमध्ये फक्त तुम्ही दोघं आणि सोबत शॅम्पेनचे ग्लास.. कशी आहे कल्पना? किंवा रॉयल स्कॉटिश कॅसलमध्ये रहा आणि व्हिस्की टेस्टिंगचा आनंद घ्या. किंवा तुम्हाला काही हटके करायचं असेल तर सँटोरिनी, मायकोनॉस सारखी ग्रीक बेटं एक्सप्लोअर करा. यासाठी खास प्रायव्हेट यॉट चार्टर करा आणि सनसेटच्या वेळी जोडीने डिनर एन्जॉय करा. जर तुम्हाला तुमची सुट्टी तुमच्या खास व्यक्तीसोबत एकांतात घालवायची असेल तर न्यूझीलंडमधल्या पॉलिनेशियन स्पा इथे रोतोरुआ तलावाच्या शांत किनाऱ्यावर आराम करा. मालदिव्समधल्या ओव्हरवॉटर बंगल्यात रहा आणि एक अफलातून अनुभव घ्या किंवा मालदिव्समधल्या चहूबाजूंनी वेढलेल्या नितळ पाण्यामध्ये प्रायव्हेट सँडबँक पिकनिकचा अनुभव घ्या.
बालीमधल्या प्रायव्हेट पूल व्हिला मध्ये रहा आणि फ्लोटिंग ब्रेकफास्टचा अनुभव घ्या. नाहीतर फिनलँड मध्ये ग्लास इग्लू किंवा लक्झरी लॉजमध्ये राहून निसर्गाचा अद्भुत चमत्कार म्हणजेच नॉर्दन लाइट्स अनुभवा. आकाशातली ही रंगांची उधळण एकमेकांच्या साथीने डोळे भरून पहा, थक्क होऊन जा.
या आणि अशा अनेक रोमँटिक डेस्टिनेशनपैकी खास तुमचा रोमँटिक गेटवे बुक करून तुमच्या आठवणी आनंदी बनविण्यासाठी आमची कस्टमाइज्ड हॉलिडे टीम तय्यार आहे.
वीणा वर्ल्ड कस्टमाइज्ड हॉलिडेज्साठी आजच संपर्क साधा: 1800 22 7979 l customizedholidays@veenaworld.com
अराऊंड द वर्ल्ड...
ट्यूलिप मेनिया ही संकल्पना ज्यावरून आली ती म्हणजे ट्यूलिपची फुलं. युरोपीय देश, त्यातही खासकरून नेदरलँड्समध्ये ट्यूलिपचा बहर लक्षवेधक ठरतो. आपल्या ताज्या रंगांनी आणि मोहक सौंदर्याने सृष्टीला नवचैतन्य देणारी ही ट्युलिप्सची फुलं. या फुलांसाठी प्रसिद्ध असलेलं इथलं किचन गार्डन हे 'गार्डन ऑफ युरोप' म्हणून ओळखलं जातं. एप्रिलच्या उत्तरार्धात ट्यूलिप्सच्या फुलांना बहर आलेला असतो. ही फुले मुख्यतः लाल, पिवळी, गुलाबी, पांढरी किंवा नारिंगी रंगाची असतात. कधी त्यांच्या खालच्या बाजूला विविध रंगांचे ठिपके किंवा पॅटर्न्स असतात, ज्यामुळे ही फुलं आणखी आकर्षक दिसतात. लांबच्या लांब पसरलेले ट्यूलिप्सचे मळे पाहत असताना वातावरणात मंद भरून राहिलेला गोडसर वास आपल्याला सुखावतो. वेगवेगळ्या रंगांचे गालिचे जमिनीवर अंथरल्यासारखं वाटतं. सारं काही डोळ्यांचं पारणं फिटावं असं.. तेव्हा चला युरोपला मार्च एप्रिलमधे ट्यूलिपच्या फुलांचा अप्रतिम उत्सव पहायला.
Post your Comment
Please let us know your thoughts on this story by leaving a comment.