Our contact numbers are currently down. Please reach us at travel@veenaworld.com or 8879973807 or 9152004513. We apologize for the inconvenience

IndiaIndia
WorldWorld
Foreign Nationals/NRIs travelling to

India+91 915 200 4511

World+91 887 997 2221

Business hours

10am - 6pm

एअरपोर्ट

17 mins. read

Published in the Sunday Sakal on 11 August, 2024

सकाळी नऊ वाजताचं फ्लाईट होत आमचं. एक अलिखित नियम म्हणजे डोमेस्टिक फ्लाइट असेल तर घरून दोन तास आधी निघायचं आणि इंटरनॅशनल फ्लाइटला तीन तास आधी. एअरपोर्ट शहरात असल्याचा फायदा. अर्थात आमच्या सर्व पर्यटकांना आम्ही इंटरनॅशनल फ्लाईट्ससाठी साडेतीन ते चार तास आधीच बोलावतो. कुठे ट्रॅफिक जाम होईल सांगता येत नाही तसंच एअरपोर्टला चेकइन, सिक्युरिटी चेक आणि इमिग्रेशनच्या रांगा किती लांब लागल्या असतील त्याचाही भरवसा नसतो. प्रीकॉशन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे डोमेस्टिक फ्लाइटसाठीही दोन तास आधी एअरपोर्टवर असलंच पाहिजे हे सवयीमध्ये चपखल बसलंय. सवयी इतक्या घट्ट असतात की कधी कधी कॉन्टेक्स्ट बदलतो हे आपल्या लक्षातही येत नाही आणि आपण सवयीप्रमाणे गोष्टी करतो. सो नऊ वाजताचं फ्लाइट असल्याने आम्ही सात वाजता पोहोचलो एअरपोर्टला. आमची कार आम्हाला सोडून निघून गेली. एअरपोर्टसमोरच्या संपूर्ण रस्त्यावर आम्ही दोघंच. एअरपोर्ट बंद. मी आणि सुधीरने एकमेकांकडे पाहिलं. हा जगातला पहिला एअरपोर्ट होता जो आमच्या स्वागतासाठी अजिबात तयार नव्हता. तो अळीमिळी गुप चिळी करून स्वत:ला बंद करून बसला होता. आम्ही बॅगा खेचत एअरपोर्टच्या दाराशी आलो. हवा पावसाळी, त्यामुळे जर पाऊस आलाच तर भिजण्याव्यतिरिक्त आमच्या हातात काहीच नव्हतं. थंडी मी म्हणत होती, जरी आम्ही बऱ्यापैकी लेअर्ड वूलन क्लोदिंगने स्वत:ला बंदिस्त करून घेतलं होतं. एअरपोर्टच्या त्या गेटवजा दाराजवळ उभे राहून आम्ही वाट बघत बसलो कुणीतरी येईल आणि दार उघडेल ह्याची. दाराला काच होती आणि आत एक काऊंटर, एक कॉफी मशीन, दोन सोफा सेट, एक सॉफ्टड्रिंक डिस्पेन्सर मशीन असा छोटासा संसार मांडला होता. आम्ही कधी ह्या पायावर तर कधी त्या पायावर शरीराचं ओझं देत उभे होतो. बराच वेळ उभं राहिल्यावर दाराच्या साईडला कलंडलेे आणि दार उघडलं चक्क. ओह, एअरपोर्ट कुलूपबंद नव्हता तर. दार उघडंच आहे म्हटल्यावर आम्ही आत घुसलो आणि सोफ्यावर हुश्श्य झालो. आता डोक्यावर छप्पर मिळालं होतं. त्यामुळे आम्ही `अब आंधी आए या तूफान‌’ आपल्याला काळजी नाही ह्या मानसिकतेत कुणीतरी येईल लवकरच करीत कॉफी मशीनमधून कॉफी करून घेतली. त्या डीस्पेन्सरमधनं वेफर्स घेतले आणि `एन्जॉय द मोमेंट‌’ म्हणत त्या शहरातली ती शेवटची वेळ मस्तपैकी घालवली. पण विमान प्रस्थान वेळेआधी अर्धा तास उरला तरी कुणाचाही अतापता नव्हता. आता मात्र आमची थोडीशी घाबरगुंडी उडाली. आपण नक्की बरोबर त्याच एअरपोर्टला आलोय नं, की दुसरा एअरपोर्ट आहे ह्या शहरात. कॉफीची रंगत उडली आणि आम्ही काळजीत पडलो. चिटपाखरू नसलेल्या त्या रस्त्याकडे विमनस्क अवस्थेत पहात बसलो आणि थोड्या वेळाने एक कार दूरवरून येताना दिसली. ख्रिस्टोफर कोलंबसला जगाच्या शोध मोहीमेत एकोणतीस दिवसांच्या समुद्रातल्या त्या एक्स्पिडीशनमध्ये पक्षांचा थवा पाहिल्यानंतर आणि त्यामुळेच जवळपास कुठेतरी जमीन असेल ह्या आशेने-विचाराने जो आनंद झाला असेल तसा आनंद आम्हाला झाला. कार एअरपोर्टसमोर उभी राहिली. एक गोरा गोमटा तरुण मुलगा खाली उतरला. आम्हाला गुडमॉर्निंग करीत त्याच्या काऊंटरवर स्थिरस्थावर झाला. आता विमानाला दहा मिनिटं उरली होती. त्याने आमचं तिकिट पाहिलं आणि बोर्डिंग पास दिला. आणखी एक फॅमिली आली तीन जणांची, विमानाच्या दहा मिनिटं आधी. प्रायव्हेट जेटलापण किमान आर्धा तास आधी बोलवतात. जरी एअरस्ट्रीपवर विमान दिसत नसलं तरी बोर्डवर आमचं विमान वेळेवर दिसत होतं. आणि पाच मिनिटं आधी आकाशात त्या विमानाचा ठिपका दिसला. छोटुकलं अठरा सीटर विमान. चार लोक खाली उतरले आणि आम्ही पाच लोक विमानात चढलो. मला तो एअरपोर्ट एखाद्या बसस्टॉप सारखा वाटला. आम्ही बाय बाय केलं हॉन्निंग्सवागला आणि  निघालो ट्रॉम्सोकडे.

ही गोष्ट पंचवीस एक वर्षांपुर्वीची, उबर आणि मोबाइलचं व्यसन आपल्याला न लागलेल्या जमान्यातली. डिसेंबरच्या महिन्यात लंडनला होतो आणि तिथून अचानक ठरवून नॉर्दन लाइट्स बघण्यासाठी आम्ही गेलो होतो. नॉर्वे देशाच्या उत्तर टोकावर, म्हणजेच जगाच्या उत्तर टोकावर हॉन्निंग्सवागला. नॉर्थ पोलपासून दोन हजार किलोमीटर्स अंतरावर असलेलं, जेमतेम अडिच हजार लोकवस्तीचं, जगाच्या मेनलॅंडवरचं आर्क्टिक सर्कलमधलं हे शेवटचं गाव. इथेच आपण बघतो नॉर्थ केपची ती फेमस ग्लोब मॉन्युमेंटवाली नॉर्दर्नमोस्ट जागा. जरी हे मेनलँडवरचंं शेवटचं गाव असलं तरी ह्यापासून नॉर्थ पोलपर्यंत अजून एक जागा आहे आठशे किलोमीटर्सवर जिथे आपण जाऊ शकतो. ती म्हणजे स्वालबार्ड आयलंडस, तेथील लाँगरबायन हे हजार लोकवस्तीचं शहर. हल्लीच आमची डिरेक्टर  सुनिला पाटील स्वालबार्डला जाऊन आली. आता आम्ही वाट बघतोय कधी एकदा स्वालबार्डला जातो त्याची. कारण नॉर्थ पोलपासून अलिकडे दोन हजार किलोमीटर्सपर्यंत जाऊन आलोय. पण सुनिला बाराशे किलोमीटर्स अलीकडेपर्यंत गेलीय मग 'सबसे आगे' म्हणणारं माझं मन सुनिलाच्या एक्स्पेडिशनला मागे टाकण्याचा प्रयत्न न करेल तरच नवल. उत्तर ध्रुवाजवळचा लाँगरबायनचा हा शेवटचा एअरपोर्ट मला बघायचाच आहे.

आमचं एक कॅम्पेन अधून मधून सुरू असतं ते म्हणजे ‌‘तुम्ही किती देश पाहिलेयत?‌‘ पण आता हा लेख लिहिता लिहिता मला सुचतंय की आपण एक असंही कॅम्पेन करायला पाहिजे, ते म्हणजे 'आजपर्यंत तुम्ही किती एअरपोर्टस पाहिलेयत?' हो म्हणजे एअरपोर्ट ही बघण्याची जागा आहे माझ्यामते, आणि माझ्या जिप्सी मनाला जगातले असे अनेक युनिक एअरपोर्टस्‌‍ बघायचे आहेत. एखादा एअरपोर्ट प्रचंड मोठा असतो जसा सौदी अरेबियाचा दमाम एअरपोर्ट जो त्याच्या शेजारील बाहरीन देशापेक्षा मोठा आहे. एखादा एअरपोर्ट अतिशय सुंदर असतो, जसा कतारमधला हमाद इंटरनॅशनल एअरपोर्ट किंवा सिंगापूरचा चांगी एअरपोर्ट. एखादा एअरपोर्ट उंचावर असतो जसा बोलिवियाचा किंवा पेरूमधला किंवा आपल्या लेहचा. अर्थात जगातले सर्वात उंचावरचे जास्तीत जास्त एअरपोर्टस्‌‍ चायनामध्ये आहेत. एखादा एअरपोर्ट समुद्रावरही असतो जसा स्कॉटलंड मधल्या `बारा आयलंड‌’मधला समुद्र किनाऱ्यावरचा एअरपोर्ट जो भरती ओहोटी प्रमाणे सुरू असतो. नॉर्थ पोलपासून जवळ असलेल्या सगळ्या देशांमधल्या प्रत्येकी एकातरी एअरपोर्टला मला भेट द्यायचीय. आपण जर ग्लोबवर नॉर्थ पोलचा टॉप व्ह्यू पाहिला तर आपल्याला एअरपोर्टस्‌‍ दिसतील. कॅनडा मधलं नुनावुट, अलर्ट, युरेका, ग्रीस फियोर्ड, रशियातलं डिक्सन मूरमांस, युके मधलं बॅरो, ग्रीनलँडमधलं थूल, सियोरापालूक कानाक. आता नॉर्थ पोलजवळचे एअरपोर्टस्‌‍ बघितल्यावर साऊथ पोलने काय वाईट केलंय, त्याच्या जवळचे एअरपोर्टस्‌‍ही बघायला पाहिजेत की. साऊथ पोलजवळच्या कंट्रिज म्हणजेच साऊथ अमेरीकेतील चिली आणि अर्जेन्टिना. तिसरा नंबर न्यूझीलंडचा, चौथा ऑस्ट्रेलियाचा आणि नंतर साऊथ आफ्रिका. जगाच्या दक्षिण टोकावरचं चिली देशातलं शेवटचं गाव म्हणजे पातागोनिया रीजनमधलं पुंता आरेनास. कसलं देखणं गाव ते, अ मस्ट व्हिजिट इन अवर ट्रॅव्हल मिशन. `वेळ आहे‌, प्रकृती ठणठणीत आहे आणि खिसा भरलेला असेल तर जगाच्या टोकावरचं हे पर्यटन जरूर करावं. दुसरा एअरपोर्ट उशुवाया, अर्जेन्टिनामधला. अंटार्क्टिकाला जाताना तिथे जाऊन आले त्यामुळे तो ऑलरेडी टिकमार्क्ड आहे. बाकी न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया वा साऊथ आफ्रिकेच्या सदर्नमोस्ट एअरपोर्टस्‌‍ना ऑलरेडी भेट दिलीय, सो साऊथ पोलजवळचे एअरपोर्टस्‌‍ बऱ्यापैकी झालेत. ह्याच आठवड्यात आम्ही ग्रीनलंडला निघालोय त्यामुळे तिथला नॉर्दन मोस्ट नाही पण एका एअरपोर्टला भेट देऊन होईल.

आपल्याला विमानात विन्डो सीट मिळाली असेल तर फ्लाइट उतरताना त्या ठिकाणचा एअरपोर्ट दिसू लागतो आणि आपल्याला त्या देशाची वा शहराची जणू तोफ्लडओळख झाल्यासारखं वाटतं. पहिल्यांदा जेव्हा मी इजिप्तला गेले तेव्हा ज्यावेळी एअरपोर्टच्या बाहेर आले तेव्हा तिथे बाहेरून येणाऱ्या व्यक्तींना घ्यायला आलेल्या कुटुंबांच्या प्रचंड गर्दीला आणि त्यांच्या चेहऱ्यांवरील आनंदाला बघून तो देश कुटुंबवत्सल असल्याची जाणीव झाली. म्हणजेच फक्त एअरपोर्टच नव्हे तर एअरपोर्टच्या बाहेरील गर्दीसुद्धा आपल्याला त्या देशाची मानसिकता दर्शविते. अशा अनेक गोष्टी ओब्झर्व करायला मिळतात आणि म्हणूनच वेगवेगळ्या कारणांसाठी मला प्रवास करायला आवडतो.

वीणा पाटील, सुनीला पाटील, आणि नील पाटील ह्यांचे प्रत्येक आठवड्यात प्रकाशित होणारे लेख वीणा वर्ल्डच्या वेबसाईट www.veenaworld.com वर वाचनाकरिता उपलब्ध आहेत.


अरेच्चा! हे मला माहितच नव्हतं...

Image of a Penguin in Antarctica

जगाच्या पाठीवर (खरंतर जगाच्या तळाशी) असा एक खंड आहे की जिथे एकही शहर वा गाव नाही, कायमस्वरूपी मनुष्यवस्तीही नाही, कोणत्याही ऐतिहासिक वास्तू वा स्मारके नाहीत, जिथे अधिकृत चलन नाही, अधिकृत राजभाषा नाही, अधिकृत राजधानीही नाही तरीही ह्या खंडाला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दरवर्षी वाढतेच आहे. गेल्याच वर्षी तब्बल एक लाख पर्यटकांनी या खंडाला भेट दिली होती. आता असा अजबगजब खंड कुठला? तर जगाच्या पार तळाशी असलेला आणि कायम बर्फाने झाकलेला ‌‘अंटार्क्टिका‌’ खंड. मानवी संस्कृतीचं केंद्र मानल्या जाणाऱ्या युरोपखंडापेक्षा अंटार्क्टिका आकाराने 40% मोठा आहे. जागतिक क्रमवारीत क्षेत्रफळाच्या बाबतीत अंटार्क्टिका वरून पाचव्या क्रमांकावर येतो. जगातल्या एकूण बर्फापैकी सुमारे 90% बर्फ इथेच साचलेला आहे. त्यामुळे जगातील गोड पाण्यापैकी सुमारे 70% पाणी इथे बर्फाच्या रूपानं साचलेलं आहे. तसं पाहिलं तर 1820 सालापर्यंत मानवाला या भूमीचं दर्शनही झालं नव्हतं. 18व्या शतकापासून ते अगदी 20व्या शतकापर्यंत या परिसरात व्हेल आणि सीलच्या शिकाऱ्यांनीच जणू आपला हक्क प्रस्थापित केला होता. पुढे या जागेचं महत्व ओळखून रीसर्च स्टेशन्स सुरू झाली आणि निसर्गाचा नाश थांबला. 1 डिसेंबर 1951 रोजी अंटार्क्टिकाच्या नैसर्गिक संपत्तीचं रक्षण करण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर एक करार करण्यात आला. त्या करारावर सही करणाऱ्या देशांनाच संशोधनासाठी अंटार्क्टिकावर तळ उभारायला परवानगी मिळते.

अशा बर्फमय खंडावरच्या पर्यटनाला सुरुवात 1957 साली झाली. या खंडावर येण्यासाठी पर्यटकांना आकर्षित करतो तो इथला जगावेगळा निसर्ग. हा खंड दक्षिण गोलार्धात असल्यानं एप्रिल ते जुलै हा इथला हिवाळा असतो तर नोव्हेंबर ते जानेवारी हा उन्हाळा. या काळात इथे येणाऱ्या पर्यटकांना अंटार्क्टिकावरचे अनोखे वन्यजीव पहायला मिळतात. सात प्रकारचे पेंग्विंन्स इथे रहातात, त्यांच्या वसाहती पाहणं मनोरंजक असतं. त्याबरोबरच अल्बाट्रोस, स्कुआ, गल्स, टर्न्स, पेट्रेल्स यांचे मोठे थवे असतात. एलिफंट सील, क्रॅब इटर सील, लेपर्ड सील सारखे शिकारी प्राणी इथे आहेत. शिवाय अंटार्क्टिकाचे खास आकर्षण म्हणजे महाकाय व्हेल्स. या भागात दहा प्रकारचे व्हेल्स आढळतात. अंटार्क्टिकाचं पर्यटन हे क्रुझवरून केलं जातं. मात्र तिथल्या छोट्या बेटांवर उतरण्यासाठी ‌‘झोडियाक‌’ या लहान नौकांचा वापर केला जातो. त्या नौकांमधून जलप्रवास करून बेटांवरील रीसर्च स्टेशन्स, निसर्ग आणि पक्ष्यांच्या वसाहती बघता येतात. त्यामुळे अंटार्क्टिकाची भेट ही अतिशय संस्मरणीय असते. वीणा वर्ल्डने ह्या वर्षी अंटार्क्टिकाच्या दोन सहली यशस्वीरित्या पूर्ण केल्या आहेत. आता पुढची सहल डिसेंबरमध्ये जाणार आहे, तिचा अवश्य लाभ घ्यावा.


वीणा वर्ल्ड ट्रॅव्हल मिशन

Veena World Travel Mission

होममेकर ते ग्लोबट्रॉटर

फार नाही एक बारातेरा वर्षांपुर्वी जर मला कुणी सांगितलं असतं की तू जगाच्या पाठीवरचे वेगवेगळे देश, त्यातील माणसं, त्यांची संस्कृती, तिथला निसर्ग, त्यांचा इतिहास बघत फिरशील तर कदाचित माझाही विश्वास बसला नसता. पण 2013 मध्ये ‌‘वीणा वर्ल्ड‌’ बरोबर माझी गट्टी काय जुळली आणि आता माझे जगभरातले 44 देश बघून झाले सुध्दा. पुढच्या महिन्यात मी ‌‘ट्युनिशियामाल्टासिसिली‌’ अशी टूर करणार आहे तर ऑक्टोबरमध्ये ‌‘बाली‌’ ला भेट देणार आहे. त्यामुळे मग मी बघितलेल्या देशांची संख्या 47 होईल, म्हणजे देशांचं अर्ध शतक पूर्ण करण्याच्या मी अगदी जवळ आले असेन. त्यामुळे मी जाम एक्सायटेड आहे. आज ही एक्साइटमेंट मी अनुभवतेय कारण माझे पती महेश शिंदे यांनी मला पर्यटनासाठी कायम प्रोत्साहन दिलं आहे. त्यांनी दिलेल्या प्रोत्साहनामुळे मला फिरण्याचा उत्साह मिळाला तर जगभरात एकटीने फिरण्याचा आत्मविश्वास मला वीणा वर्ल्डच्या वुमन्स स्पेशल सहलींनी दिला. या सहलींची संकल्पना प्रत्यक्षात आणल्याबद्दल वीणा पाटील यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत. विशेषतः या सहलींवर सिंगल महिलांना रूम शेअरिंग पार्टनर मिळण्याची हमी वीणा वर्ल्ड देतं, त्यामुळेच अगदी किफायतशीर किमतीमध्ये मला जगप्रवास करता आला. निसर्गसौंदर्याने नटलेले देश मला बघायला आवडतात. आजपर्यंतच्या जगभ्रमंतीत स्कॉटलंडमधील एडिनबरा, नॉर्वेची मिडनाइट क्रूझ, स्वित्झर्लंडमधील माउंट युंगफ्राऊ आणि क्रोएशिया हा देश, ही ठिकाणं तिथल्या अप्रतिम निसर्गामुळे मला फारच आवडली आहेत. मला या ठिकाणांवरचा निसर्ग जसा आवडला त्याचप्रमाणे तिथली माणसं, शिस्त, स्वच्छता यांनीही प्रभावित केलं. या भटकंतीतच मला सापडला ‌‘डिस्नेलँड‌’चा खजिना. तिथल्या मनोरंजनावर मी इतकी फिदा आहे की हाँगकाँगमधल्या डिस्नेलँडला मी दोनवेळा भेट दिली आहे शिवाय ओरलँडो आणि पॅरिसमधील डिस्नेलँडची मजाही मी लुटली आहे. जर्मनीच्या इतिहासाचं मला आकर्षण होतं, ईस्टर्न युरोप टूरमध्ये मी जेव्हा ‌‘ऑशवित्झ कॅम्प‌ पाहिला तेव्हा अगदी हादरून गेले होते. अमेरिकेतल्या सुप्रसिध्द नायगरा फॉल्सवरची हेलिकॉप्टर राइड मी कधीच विसरू शकत नाही. फिरण्याचं वेड माझ्यात इतकं भिनलं आहे की कोव्हीड नंतर निर्बंध होते तेव्हा मी लडाखला भेट दिली आणि पर्यटनात खंड पडू दिला नाही.


काय बाई खाऊ कसं गं खाऊ!

परदेशात लोकप्रिय झालेली भारताची सिग्नेचर डिश कुठली? या प्रश्नाचं उत्तर चटकन ‌‘बिर्यानी‌’ असं दिलं तर आश्चर्य वाटणार नाही कारण खरं आश्चर्य हेच आहे की सगळ्या भारतानं स्विकारलेली आणि आपल्या मसाल्यात घोळवलेली ‌‘बिर्यानी‌’ मुळात भारतीय नाही. या पदार्थाचे नाव ‌‘बिरिंज‌’ या पर्शियन शब्दावरून आलं आहे. बिरिंज म्हणजे पर्शियन भाषेत ‌‘भात‌. त्याचप्रमाणे पर्शियन भाषेत ‌‘बिर्यान‌’ किंवा ‌‘बेरियान‌’म्हणजे आधी तळून मग शिजवलेला पदार्थ. त्यामुळे बिर्यानीचा उगम पर्शियात झाला असावा असे मानले जाते. आपल्या भारतीय खाद्यपरंपरेत बिर्यानी आली ती मुघल बादशहांच्या राजवटीत. मात्र काही खाद्यतज्ञ सांगतात की त्याआधी साधारण इसवी सन पूर्व काळात दक्षिण भारतात ‌‘ओंचोरू‌’ म्हणून जो पदार्थ तयार केला जात असे तो बिर्यानीचा पूर्वज आहे. भारताच्या वेगवेगळ्या राज्यात बनवल्या जाणाऱ्या बिर्यानीचे प्रकार प्रसिध्द आहेत. बिर्यानी म्हटल्यावर प्रामुख्याने मटण किंवा चिकन पासून तयार केलेली बिर्यानीच आठवते. आता शाकाहारींसाठी पनीर आणि भाज्या वापरूनही बिर्यानी केली जाते. भारतात वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्या ठिकाणच्या स्थानिक पाककलेची आणि मसाल्यांची जोड मिळाल्याने त्या त्या राज्यातली बिर्यानी लोकप्रिय झाली आहे. दक्षिणेतल्या आंध्रमधली ‌‘हैद्राबादी‌’ बिर्यानी, आता सिंध प्रांत भारतात नसला तरी तिथले लोक रहात असल्याने त्यांची ‌‘सिंधी बिर्यानी‌’, नवाबांच्या शहरातली ‌‘लखनवी बिर्यानी‌’,‌‘अवधी बिर्यानी‌’ या शिवाय चेट्टीनाड बिर्यानी, बोहरी बिर्यानी, दम बिर्यानी असे बिर्यानीचे अनेक प्रकार भारतात मिळतात. या प्रत्येक बिर्यानीचे घटक साधारण समान असले तरी बिर्यानीचा स्वाद मात्र वेगळा आहे. हा स्वाद म्हणजे भारताच्या अनेकतेतील एकतेचं प्रतिक आहे म्हणता येईल. देश-विदेशातील अशाच विविध खाद्यपरंपरा आणि ट्रॅव्हलचे भन्नाट अनुभव ऐकण्यासाठी वीणा वर्ल्डचा ‌‘ट्रॅव्हल एक्सफ्लोअर सेलिब्रेट लाईफ‌’हा पॉडकास्ट नक्की ऐका.


इंडियन बुटिक हॉटेल्स

वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्सोबत

भारतातल्या पर्यटनस्थळांवर हॉलिडे एन्जॉय करायचा एक झकास मार्ग म्हणजे बुटिक हॉटेल्समध्ये निवास करणं. आता बुटिक हॉटेल्स म्हणजे काय? तर कॉर्पोरेट हॉटेल्सच्या सुविधा पर्सनल टचसह देणारी हॉटेल्स. या हॉटेल्समध्ये भरपूर रूम्स नसतात, त्यामुळे इथे पर्यटकांची गर्दी नसते. या हॉटेल्सची इमारत पारंपरिक पध्दतीची तरीही स्टायलिश असते. एखाद्या जुन्या राजवाड्याचे, खानदानी कोठीचे रुपांतर आरामदायी हॉटेलमध्ये केलं जातं जिथे पर्यटकांना पर्सनलाइज्ड सर्विस मिळते, प्रायव्हसी असते. तिथल्या वातावरणामुळे तुम्हीही जणू स्थानिक बनून त्याचा आनंद लुटता.

दक्षिण भारतातील केरळच्या किनाऱ्यावरच्या कोची ह्या इतिहासकाळापासून मसाल्याची निर्यात करणाऱ्या शहरात तुम्ही कलोनियल काळातील जीवनाची आठवण करून देणारा बुटिक स्टे अनुभवू शकता. इथे ब्रिटिश काळातील एका ट्रेडिंग हाउसचं नूतनीकरण अशा पध्दतीनं केलं आहे की जुन्या काळाच्या खुणा ही राहतील आणि फाईव्ह स्टार सुविधाही मिळतील. या हॉटेलच्या प्रायव्हेट जेटीवरून सनसेट क्रुझ निघते तिची मजा तुम्ही लुटू शकता तसंच कोचीच्या ऐतिहासिक बंदराचा नजारा पहात इथल्या प्रोमेनाडवर स्वादिष्ट जेवणाचा आस्वादही  घेऊ शकता.

तुम्हाला ब्रिटिश राजमधल्या टी प्लान्टेशनमध्ये अगदी त्याच ढंगात रहायचा अनुभव घ्यायचा असेल तर दार्जिलिंगमध्ये असे बुटिक स्टे उपलब्ध आहेत. रंगीत नदीच्या काठावरच्या चहाच्या मळ्यातील सुमारे 165 वर्षांपूर्वीचे दोन मस्त बंगले आता तुमच्या हॉलिडेची मजा वाढवतात. वेगवेगळ्या थीम्सनी सजवलेल्या बेडरूम्स, वरांडे आणि भोवतालचे गार्डन्स यामुळे इथला मुक्काम अगदी कायम लक्षात रहाणारा होतो. टी फॅक्टरी टूर, टी टेस्टिंग, चहाच्या मळ्यात फिरून स्वतः चहा खुडणे असे अनुभव तुम्ही इथे घेऊ शकता.

आपल्या महाराष्ट्रातही अशा बुटिक हॉटेलमधील निवासाचा खास अनुभव घेता येतो तो कोकणातल्या सावंतवाडीमध्ये. या गावातील रॉयल पॅलेसमध्ये निवास करण्याची संधी उपलब्ध झाल्यामुळे इतिहासातील राजेशाही जीवनशैलीचा थेट अनुभव घेता येतो. कलाकौशल्याचं गाव म्हणून प्रसिध्द असलेल्या सावंतवाडीतल्या ह्या सावंतवाडी पॅलेस मध्ये कलाविष्कार तर पहायला मिळतोच पण खास कोकणी पदार्थांबरोबर आपल्याला अक्षरश्: ग्लोबल क्युझीन्सचा आस्वादही घेता येतो.

पहाडांमधला फुरसतचा हॉलिडे अनुभवायचा असेल तर नैनितालजवळच्या गेठिया गावातलं बुटिक हॉटेल एकदम झक्कास आहे. साधारण सव्वाशे वर्षं जुनी असलेली ही प्रॉपर्टी अशा निसर्गरम्य परिसरात आहे की इथे राहून त्याचा आनंद घेणं हाच एक अनुभव असतो. चवदार पदार्थांचा पूलसाईड ब्रेकफास्ट, बर्ड वॉचिंग, पहाडात सायकल चालवणे, बॉनफायर विथ लाइव्ह म्युझिक अशा गोष्टी तुमचा इथला मुक्काम संस्मरणीय करतात.

भारतातला बुटिक हॉटेलमधला हॉलिडे एन्जॉय करण्यासाठी बरेच पर्याय आहेत. मध्य प्रदेशच्या पेंचमधील स्टार बेड एक्सपीरियन्स देणारा विल्डरनेस कॅम्प, महेश्वर मधील ऐतिहासिक किल्ल्यातील बुटिक स्टे अशा ठिकाणी राहून तुम्ही तुमचा हॉलिडे रंगतदार करू शकता.

तर मग ठरवा आपलं डेस्टिनेशन. आपल्या मार्गदर्शनासाठी वीणा वर्ल्ड कस्टमाईज्ड हॉलिडेज्‌ ची टीम सज्ज आहेच.


वुमन्स स्पेशल व्हिएतनाम!

Visiting Vietnam Here are 10 Things to Do to Have a Blast on your Trip

येताय नं आशियातला एक अफलातून आणि इन्स्पायरिंग देश बघायला?

गेल्या दोन वर्षात भारतातील पर्यटक सर्वात जास्त कोणत्या देशात गेले असतील तर तो आहे व्हिएतनाम. प्रखर राष्ट्रप्रेम आणि `जिंकू किंवा मरू‌’ ह्या जोशाने अखंड झूंज देऊन अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला नामोहरम करून परत पाठविणारा व्हिएतनाम आपल्याला खूप काही शिकवून जातो. आपल्या भारतीय पर्यटकांना व्हिएतनाम तेवढासा माहीत नव्हता, किंवा त्यांच्या बकेट लिस्टमध्ये आत्ता आत्तापर्यंत तो नव्हताच. व्हिएतनामची क्रेझ आत्ता आत्ताची. तिथे गेल्यावर तेथील निसर्गसौफ्लदर्य आणि मॅनमेड वंडर्स बघून असं वाटतं की `अरे, आपण आधी का नाही ह्या देशाला भेट दिली. तसा आपल्या जवळचा हा देश तरीही आपण कसे अजून आलो नाही‌’. आत्तापर्यंत वीणा वर्ल्डसोबत अक्षरश: हजारो पर्यटक व्हिएतनामला जाऊन आले आणि प्रत्येकाच्या फीडबॅकमध्ये तेच आश्चर्य बघायला मिळतं. अजून एकही पर्यटक मला व्हिएतनाम विषयी निगेटिव्ह बोलताना दिसला नाही. सो व्हिएतनाम तुमच्या ट्रॅव्हल लिस्टमध्ये असणं अपरिहार्य आहे. व्हिएतनामसाठी आमच्याकडे ग्रुप टूर्सचे अनेक पर्याय आहेत. कस्टमाईज्ड हॉलिडे तुम्ही बनवून घेऊ शकता. कॉर्पोरेट टूर्स तर मोठ्या प्रमाणावर व्हिएतनामला घेऊन जातोय आम्ही. आता तर नोव्हेंबर मध्ये प्रोमो प्राइस मध्ये वुमन्स स्पेशलही आणलीय आम्ही. मात्र बुकींग करायला उशीर करू नका. वुमन्स स्पेशलसाठी प्रोमो प्राइस एवढ्याचसाठी की जास्तीत जास्त महिलांना आम्हाला व्हिएतनाम देश दाखवायचाय, तिथलं सौफ्लदर्य त्यांनी डोळे भरून बघावं, नाचावं, बागडावं, मिरवावं, व्हिएतनामच्या आनंदात स्वत:ला हरवून टाकावं, रीफ्रेश व्हावं, रीज्युविनेट होऊन आनंदाने आयुष्याला सामोरं जावं. घरातली महिला खूश तर सारं घर खूश. `शी मस्ट एन्जॉय हर लाइफ टू द फुल्लेस्ट‌! चलो, बॅग भरो, निकल पडो!

August 10, 2024

Author

Veena Patil
Veena Patil

‘Exchange a coin and you make no difference but exchange a thought and you can change the world.’ Hi! I’m Veena Patil... Fortunate enough to have answered my calling some 40+ years ago and content enough to be in this business of delivering happiness almost all my life. Tourism indeed moulds you into a minimalist... Memories are probably our only possession. And memories are all about sharing experiences, ideas and thoughts. Life is simple, but it becomes easy when we share. Places and people are two things that interest me the most. While places have taken care of themselves, here are my articles through which I can share some interesting stories I live and love on a daily basis with all you wonderful people out there. I hope you enjoy the journey... Let’s go, celebrate life!

More Blogs by Veena Patil

Post your Comment

Please let us know your thoughts on this story by leaving a comment.

Looking for something?

Embark on an incredible journey with Veena World as we discover and share our extraordinary experiences.

Balloon
Arrow
Arrow

Request Call Back

Tell us a little about yourself and we will get back to you

+91

Our Offices

Coming Soon

Located across the country, ready to assist in planning & booking your perfect vacation.

Locate nearest Veena World

Listen to our Travel Stories

Veena World tour reviews

What are you waiting for? Chalo Bag Bharo Nikal Pado!

Scroll to Top